शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!

इमेज
  श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मान्यता आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.  विशेष म्हणजे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार हयात असताना धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करून नियोजन विभागामार्फत राबवण्याची मागणी केली होती, त्या मागणीसही शिखर समितीने मंजुरी दिली असून, आता श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा नियोजन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.  या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या व आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध...

 दुचाकी कार अपघातात  एक ठार, एक जखमी 







गेवराई :प्रतिनिधी...

राजपिंपरी येथील दोघेजण गेवराई येथे कपडे खरेदी करून गावाकडे जात असताना छोटा हत्ती ( रिक्षा ) ने कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेला एक जण  खाली पडले. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने त्याला चिरडल्याने यात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शहरा जवळील जमादारणीच्या फुलाजवळ रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या  सुमारास घडली.

    भुषण भागवत पानखडे  वय १५ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नावं तो आत्ताच नववीची परीक्षा पास होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. तर सोबत असलेला चुलत भाऊ गणेश विठ्ठल पानखडे असे जखमीचे नाव  असून दोघे राहणार राजपिंपरी.ते दोघे रविवार रोजी दुपारी ३ वाजण्याच्या  सुमारास  गेवराई येथे कपडे खरेदी करून‌ राजपिंपरी कडे जात असताना शहरा जवळी जमादारणीच्या फुलाजवळ बाजूला असलेल्या छोटा हत्ती (  रिक्षा ) ने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला भूषण वानखडे खाली पडला. त्यावेळी समोरुन येणारी कार  त्यांच्या अंगावरून गेल्याने यात  याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश विठ्ठल पानखडे हा किरकोळ जखमी झाला. घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद चालु होती. भूषण पानखडे च्या पश्चात आई,वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या