विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

अंबाजोगाई (प्रतिनिधी) -  येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. डॉ तरकसे हे नियमितपणे पोहणाऱ्या पैकीच एक होते मात्र तरीही त्यांचा पोहतांना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ होत आहे. सदरील घटना ही आज सकाळी ६:३० च्या सुमारास ही उघडकीस आली आहे. या वृत्तामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी  काळवटी तलावाकडे धाव घेतली.

           डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाणे अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आले असतांना त्यांनी जवळ जाऊन खात्री केल्यानंतर हा मृतदेह डॉ. अभिमन्यू तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.


*अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले होते शिखर*


मूळचे अंबाजोगाई जवळील धावडी गावचे रहिवासी असलेल्या डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली. पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉ. तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून देखील कार्यरत झाले होते.

दरम्यान डॉ तरकसे यांच्या या दुर्दैवी निधनाने वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्रांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि  डॉ तरकसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. डॉ. तरकसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले, याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. एका अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्याने अंबाजोगाई शहरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या काळवटी साठवण तलावात दिवसेंदिवस पोहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढतांना आढळून येत आहे. वर्षातून दोन ते तीन पोहणाऱ्यांचा बळी याच तलावात पोहतांना जात आहे. यामुळे त्यांची कुटुंब उघड्यावर पडत आहेत. त्यामुळे या तलावावर पोहण्यासाठी निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या