शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!
अत्यंत दुर्मिळ “संत जगमित्रनागा अभंग गाथा” प्रकाशनाच्या उंबरठ्यावर
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
संत साहित्यप्रेमी, वारकरी, कीर्तनकार आणि अध्यात्मिक अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी “अत्यंत दुर्मिळ संत जगमित्रनागा अभंग गाथा” ही ग्रंथसंपदा आता प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आली असून प्रकाशनपूर्व नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. अवघ्या ४० रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या गाथेसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गाथेमध्ये संत जगमित्रनागा यांच्या दुर्मिळ अभंगांसह त्यांचा भावार्थही समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार तसेच संत साहित्याची आवड असणाऱ्या भाविकांसाठी ही गाथा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. संत साहित्य क्षेत्रातील एकमेवाद्वितीय आणि दुर्मिळ मानली जाणारी ही अभंग गाथा अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक म्हणून परिचित असलेले ॲड. दत्तात्रेय आंधळे यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांनी विविध चरित्रग्रंथ प्रकाशित केले असून त्यांच्या लेखनाला संत साहित्य क्षेत्रात विशेष मान्यता मिळाली आहे. परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा यांच्या चरित्र, अभंग आणि अध्यात्मिक जीवनाचा फारसा प्रसार झालेला नसताना, त्यांचे कार्य आणि विचार व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे. संत जगमित्रनागा यांच्या जीवनचरित्रासह त्यांच्या अभंगांचा अभ्यासपूर्ण आढावा या गाथेत घेण्यात आला असून भाविकांनी व संत साहित्य अभ्यासकांनी प्रकाशनपूर्व नोंदणी करून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी सेवामूल्य केवळ ४० रु. आहे.......फोन पे क्रमांक : ९४२१३३७०५३ यावरून आपण ग्रंथखरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा