मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन..
वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनि मंदिरात श्री.शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा
परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)
येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनिवारी (ता.१६) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळन करत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध सामाजिक, रक्तदान शिबीर, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात अनादी काळापासून दरवर्षी श्री.शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या ४६ वर्षांपासून श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि.१०) ते शनिवार (दि.१७) आठ दिवस किर्तन, भजन, परमरस्य पारायण, रक्तदान शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुवारी (दि.१४) रक्तदान शिबीरात ३१ महिला व युवकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. याच दिवशी विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. या सप्ताहात रोज सायंकाळी सहा ते आठ पावले खेळण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शनिवारी (दि.१६) शनी अमावस्या व श्री. शनैश्वर जयंती निमित्त आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाई, सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या आर्शिवचनानंतर सायंकाळी सात वाजून ०४ मिनीटांनी पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून करत साजरा करण्यात आल्यानंतर महिलांनी श्री शनी देवाचा पाळणा म्हटल्यावर महाआरती करण्यात आली. यावेळी परळीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक सौ.जयश्रीताई मोगरकर, माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी साडेचार ते शनैश्वर जन्मोत्सवा पर्यंत गुरुलिंग महाराज फुटके गाढे पिंपळगावकर यांचे किर्तन संपन्न झाले. शनैश्वर जन्मोत्सवा नंतर साडेसात ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप शनीमंदिर येथे करण्यात आले. विशेषतः महिलांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था व महिलांना महिलांनीच प्रसादाचे वाटप केले. या महाप्रसादास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनी अमावस्या व शनैश्वर जन्मोत्सव एकाच वेळी तब्बल सोळा वर्षांनंतर दुर्लभ योग जुळून आल्याने सकाळपासूनच श्री शनी देवाच्या दर्शनासाठी शनी भक्तांनी गर्दी केली होती. हजारों भाविकांनी सायंकळ पर्यत दर्शनाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा