विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)
महत्त्वाची व्यावसायिक संधी : परळी वैजनाथ नगर परिषदेकडून व्यापारी संकुलातील दुकानांचा ई- लिलाव जाहीर ; २७ दुकाने उपलब्ध
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळी वैजनाथ नगर परिषदेकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या सार्वजनिक ई-लिलावाची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, या ठिकाणी २७ दुकाने उपलब्ध आहेत.इच्छुक व्यापाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार आहे.
नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या आवडीच्या दुकानाची पाहणी करून नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, शॉप अॅक्ट परवाना अथवा उद्योग प्रमाणपत्र आणि नगरपालिकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ई-लिलाव प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. निविदा शुल्क ५ हजार रुपये (ना-परतावा) तर अनामत रक्कम ५० हजार रुपये (परतावा) ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र टेंडर भरावे लागणार असून सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यास दुकान सोपविण्यात येईल. प्रत्येक दुकानाचे शासकीय मूल्यांकन किमान २० लाख रुपयांपासून पुढे निश्चित करण्यात आले आहे. निवड झालेल्या निविदाधारकांनी एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ३० दिवसांच्या आत भरावी लागणार असून उर्वरित ५० टक्के रक्कम पुढील ६० दिवसांत दोन टप्प्यांत जमा करावी लागणार आहे. संपूर्ण रक्कम भरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या व्यापारी संकुलात एकूण २७ दुकाने उपलब्ध असून प्रत्येक दुकानासाठी मासिक भाडे ४ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. हे संकुल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आले असून शहरातील व्यापाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची व्यावसायिक संधी आहे.निविदा (टेन्डर) भरण्याकरिता १. भन्साळी कॉम्प्युटर्स 9923702345, २. सोमेश्वर एन्टरप्रायजेस 8087830003, ३. रुद्राज एन्टरप्रायजेस 9405464368 याठिकाणी इच्छुक संपर्क साधू शकतात.व्यापाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची व्यावसायिक संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा