विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

 बाळासाहेब दोडतले यांना मातृशोक; कमलबाई दोडतले यांचे निधन

अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई प्रभाकर दोडतले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दोडतले कुटुंबावर आणि चतुरवाडी परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. 

दिवंगत कमलबाई दोडतले यांच्या पार्थिवावर आज, १९ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथील त्यांच्या खाजगी शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी अंबाजोगाई आणि परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दोडतले कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या