शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!

इमेज
  श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मान्यता आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.  विशेष म्हणजे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार हयात असताना धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करून नियोजन विभागामार्फत राबवण्याची मागणी केली होती, त्या मागणीसही शिखर समितीने मंजुरी दिली असून, आता श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा नियोजन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.  या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या व आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध...

अध्यक्ष सुरेश मुळे यांची घोषणा...

 अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश प्रवक्तेपदी  पत्रकार सिद्धेश्वर कुलकर्णी यांची निवड



चाकूर, जि. लातूर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश प्रवक्ता पदी चाकूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. 

महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काल ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पत्रकारितेच्या माध्यमातून गेली दोन दशके सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम श्री कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महासंघाने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

नवनिर्वाचित प्रदेश प्रवक्ता सिद्धेश्वर कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "अध्यक्ष सुरेश मुळे व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यास पात्र राहून महासंघाची ध्येयधोरणे, सामाजिक उपक्रम व विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन. समाजहितासाठी लेखणी व वाणी दोन्हीचा उपयोग करीन."

श्री कुलकर्णी यांच्या निवडीचे वृत्त समजताच चाकूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

प्रदेश प्रवक्ता म्हणून आता संघटनेची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची व ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महासंघाच्या कार्याला गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी श्री कुलकर्णी यांच्यावर असणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या