मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन..

इमेज
  नेकनूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाची हाक माजी सैनिकाला मारहाण, अत्याचाराच्या घटनांविरोधात संतप्त नागरिक एकवटणार नेकनूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील निगूर परिसरात घडलेल्या विविध घटनांच्या निषेधार्थ रविवार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता “हिंदू जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेकनूर (निनगूर) (शेळी बाजार) येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माजी सैनिकाला झालेली मारहाण, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, जबरदस्ती धर्मांतराचे प्रयत्न तसेच निगूर (नेकनूर) परिसरातील कथित हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. “आता किती दिवस सहन करायचे?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चामध्ये वाढती गुंडशाही, जमीन अतिक्रमण, गोहत्या, लोकसंख्येचे असंतुलन तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागण्या मांडल्या जाणार असल्याचे पोस्टरमधून स्पष्ट करण्यात आले आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्याचे आमदार महेश (दादा) लांडगे आणि संग्राम (भैय्या) जगताप यांची प्रमुख ...

नागापूर-टोकवाडी रस्त्यावर भिषण आपघात; तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     परळीपासुन काही अंतरावर टोकवाडी- नागापूर रस्त्यावर  अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एका तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास  घडली आहे.

       टोकवाडी ते नागापूर  रस्त्यावर झालेल्या एका भीषण  अपघातात संतोष गणपतराव गुट्टे वय ४४  (ह. मु. शक्तीकुंज वसाहत,परळीवैजनाथ) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत संतोष गुट्टे हे  आरोग्य विभागात कुष्ठरोगतज्ञ म्हणून कार्यरत होते.  तर कन्हेरवाडी हे त्यांचे आजोळ आणि सासर होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा पश्चात आई ,वडील ,दोन बहीणी ,पत्नी,दोन मूलं असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुट्टे हे नागापूर येथे काम आटोपून मोटरसायकल वरून थर्मल कॉलनीकडे परतत होते. दरम्यान, नागापूर-टोकवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक सारोळे व जमादार मच्छिंद्र कप्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागापूर_ टोकवाडी या मार्गावर आधीच विनापरवाना वीटभट्ट्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या मार्गाची अक्षरशः दैना झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु या समस्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या