मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन..
नेकनूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाची हाक माजी सैनिकाला मारहाण, अत्याचाराच्या घटनांविरोधात संतप्त नागरिक एकवटणार नेकनूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील निगूर परिसरात घडलेल्या विविध घटनांच्या निषेधार्थ रविवार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता “हिंदू जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेकनूर (निनगूर) (शेळी बाजार) येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माजी सैनिकाला झालेली मारहाण, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, जबरदस्ती धर्मांतराचे प्रयत्न तसेच निगूर (नेकनूर) परिसरातील कथित हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. “आता किती दिवस सहन करायचे?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चामध्ये वाढती गुंडशाही, जमीन अतिक्रमण, गोहत्या, लोकसंख्येचे असंतुलन तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागण्या मांडल्या जाणार असल्याचे पोस्टरमधून स्पष्ट करण्यात आले आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्याचे आमदार महेश (दादा) लांडगे आणि संग्राम (भैय्या) जगताप यांची प्रमुख ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा