इंदपवाडीच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला आनंदनगरीतून! परळी दि. 26 (प्रतिनिधी) चटकदार, मटकदार, खमंग पदार्थांचा आस्वाद घेत इंदपवाडी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आज आनंदनगरी मध्ये सहभाग घेतला! शाळेचे प्रांगण म्हणजे जणू आज एखादे बाजाराचे ठिकाण वाटत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे आज आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशव मुंडे, माजी सरपंच श्री मोहन मुंडे, माजी सरपंच श्री भागवत मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य श्री वैजनाथ मुंडे यांच्यासह श्री रामकृष्ण मुंडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून आनंदनगरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उपस्थित सर्व अतिथींचे व ग्रामस्थांचे स्वागत केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने तयार केलेल्या पौष्टिक, खमंग पदार्थांना विक्रीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना हा पदार्थ तयार करत असताना कोण कोणत्या वस्तू किती वजनाच्या प्रमाणात आणि...