परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले स्वागत

 पुसदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांचे परळीत स्वागत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):     

        पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले.

          यावेळी परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौ. मोहिनीताई नाईक या नवनिर्वाचित नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रभू वैद्यनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी परळी येथे आल्या होत्या. यावेळी परळी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. दोन्ही नगराध्यक्षांमध्ये यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान स्नेह, समन्वय आणि विकासाच्या संकल्पनेतून दोन्ही नगरपरिषदांमधील सहकार्य अधिक दृढ व्हावे, अशी भावना दोन्ही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार