बीड जिल्ह्यात पुन्हा एक खून!

इमेज
  विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; पतीसह सासरा व सासूवर गुन्हा दाखल बीड: हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   कचरु किसन घुले यांनी याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पावलाने घरात यश आले नाही, असे म्हणून पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली जात होती.   ८ जून २०२६ रोजी संध्या हिचा मृतदेह कुटेवाड...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची मागणी....

परळी वैजनाथ तालुक्यात सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; गहू ज्वारी हरभरा टरबूज पिकांचे नुकसान




परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

   परळी तालुक्यात सर्वदूर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यात गहू, ज्वारी, हरभरा यासह टरबुजाचे नुकसान झाले. परळी शहरात पावसाने पोलवर करंट उतरून एक शेळी दगावली आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. 

      परळी तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. परळी वैजनाथ तालुक्यातील पिंपळगाव मंडळात मोठ्या प्रमाणावर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने शिवारात झाडे, विजेचे खांब अक्षरशः उमळून पडले तर गहू, ज्वारी व हरभरा पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. गहू, ज्वारीची पिके या वाऱ्याने व पावसाने आडवी पडल्याचे चित्र बघायला मिळाले. नागापूर, धर्मापुरी, मोहा, बेलंबा, कौठळी, गर्देवाडी शिरसाळा, दौनापूर करेवाडी या सर्व पट्ट्यांमध्ये पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकासह टरबुजाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ऊस आणि ऊस तोडीसाठी उसाच्या फडांमध्ये आलेल्या ऊसतोड कामगारांची या अवकाळी पावसाने मोठी तारांबळ उडाल्याचेही दिसून आले.

      दरम्यान, परळी शहरातील मिलिंदनगर भागात विजेचा शॉक लागून एक शेळी दगावल्याची घटना घडली आहे. मिलिंदनगर या भागातील  खांबातून करंट उतरल्यामुळे बायनाबाई कांबळे यांची एक शेळी दगावल्याची घटना घडली आहे.

       परळी वैजनाथ तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार यांनी केली आहे. अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा काढणीस आलेले पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  परळी तालुक्यातील सर्वच गावातील तसेच लमांन तांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गावात दारावती तांडा, वसंतनगर, मलकापूर, वैजवाडी, मोहद्रा केशवनगर या परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. उभ्या शेतातील गहु, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकर्‍यांचे रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा आदीसह अन्य पिकांचे काढा आलेले व काढणी केलेले पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या