आ. धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

अवकाळी पाऊस, गारपिटीने परळी मतदारसंघात पिकांचे नुकसान


आ. धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - कालपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलानंतर परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यासह परळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये अवकाळी पाऊस, वादळासह गारपीट झाल्याने उभ्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना परळी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दूरध्वनी द्वारे केले आहेत. 

       रविवारी रात्रीपासून परळी मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व बऱ्याच गावांमध्ये गारपीट झाली असून, त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी धनंजय मुंडे यांनी तत्काळ पंचनामे करून नुकसानीचे अहवाल शासनास पाठवण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

      या पूर्वी देखील खरीप हंगामात विशेष करून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात परळी मतदारसंघात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून पंचनामे व अन्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची देखील भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...