विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 श्री संत गाडगेबाबा नगरमधुन स्वच्छता मोहिमेची सुरूवात करणार -सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी

परळी वै.| प्रतिनिधी -

 श्री संत गाडगेबाबा नगर मधुन स्वच्छतेची सुरुवात करणार असे प्रतिपादन परळी न.प. च्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे. 

 आज श्री संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती संत गाडगेबाबा या नगरमध्ये (पुर्वीची चुकार गल्ली) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना स्वच्छ परळी सुंदर परळी या ब्रिदवाक्याला अनुसरुन आपण सर्व मिळून परळी स्वच्छ करू असा निर्धार सौ.धर्माधिकारी यांनी केला. संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने आपण सभागृहासाठी पूर्ण ते सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिला. याकामी नागरिकांनी सुध्दा सहकार्य करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली. 

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन परळी तहसिलचे पुरवठा अधिकारी बालाजी कचरे, या भागातील माजी नगरसेवक अनिल आष्टेकर, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ताटे, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके, ॲड.अर्जुनराव सोळंके, सुशिल हरंगुळे इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर ताटे, लक्ष्मण ताटे, अमर ताटे, सोमनाथ ताटे, अतुल ताटे, दत्ता ताटे, डिगांबर ताटे, महेश ताटे, राम ताटे, अजय शिंदे, अशोक जाधव, सचिन कोकरे, स्वप्निल जाधव, रूपेश वाघमारे, महादेव पवार, विजय जाधव, कृष्णा सुर्यवंशी, महादेव ताटे इत्यादींनी प्रयत्न केले.

 श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अनेकांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन उत्तरेश्वर सोळंके यांनी केले आभार प्रदर्शन शंकर ताटे यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला, पुरुष, बालक आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा स्वाद सगळ्यांनी घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या