श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त परळीत उत्साहात कार्यक्रम

श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त परळीत उत्साहात कार्यक्रम



श्रीसंत गाडगेबाबा आपल्यासाठी दीपस्तंभ; 'स्वच्छ परळी, सुंदर परळी'चा संकल्प सिद्धीस नेणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): "श्री संत गाडगेबाबा यांनी  आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला.श्री संत गाडगेबाबा आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवत, परळी शहरात 'स्वच्छ परळी, सुंदर परळी' हे सिद्धेश नेण्याचा आपला निर्धार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेमध्ये सहभागी होऊन तो लोकसहभागातून एक यशस्वी निर्धार करावा, असे प्रतिपादन परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. 

        श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगेबाबा नगर (पूर्वीची चुकार गल्ली) येथे आयोजित  कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.यावेळी बोलताना सौ. धर्माधिकारी म्हणाल्या की, गाडगेबाबांच्या नावाने या भागात उभ्या राहणाऱ्या सभागृहासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या कार्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला साथ देऊन आपले परिसर स्वच्छ ठेवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परळी तहसीलचे पुरवठा अधिकारी बालाजी कचरे, माजी नगरसेवक अनिल आष्टेकर, सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके, ॲड. अर्जुन सोळंके, आणि सुशील हरंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर ताटे, लक्ष्मण ताटे, अमर ताटे, सोमनाथ ताटे, अतुल ताटे, दत्ता ताटे, डिगांबर ताटे, महेश ताटे, राम ताटे, अजय शिंदे, अशोक जाधव, सचिन कोकरे, स्वप्निल जाधव, रूपेश वाघमारे, महादेव पवार, विजय जाधव, कृष्णा सूर्यवंशी, महादेव ताटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरेश्वर सोळंके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शंकर ताटे यांनी मानले. या सोहळ्याला परिसरातील महिला, पुरुष व बालकांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...