परभणी जिल्ह्यास तुकाराम मुंढे नवीन पालक सचिव



     परभणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनच्या सामान्य प्रशासन विभागाने विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्त्यांबाबत आदेश जारी केले आहेत. मंत्रालय, मुंबई येथून २३ फेब्रुवारी रोजी हा शासन आदेश काढण्यात आला.

    या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी  तुकाराम मुंढे (सचिव, दिव्यांग कल्याण विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी दीपक कपूर (अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग) यांच्याकडे होती.

     प्रशासकीय कारणास्तव राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालक सचिवांमध्ये बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले पालक सचिव लवकरच कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!