परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...