इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी

 परळी नगरपालिकेनेच दिली घरपट्टी-पाणीपट्टीची बेबाकी; मग थकबाकी कशी?




‘बेबाकी देणाऱ्यां मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करा’ — ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):घरपट्टी व पाणीपट्टीची अधिकृत बेबाकी स्वतः परळी नगरपालिकेने दिल्यानंतरही संबंधित नागरिकांना थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. “बेबाकी नगरपालिकेनेच दिली कशी, मग आज अचानक बाकी कशी?” असा थेट प्रश्न ज्ञानेश्वर राजमाने यांनी उपस्थित केला आहे.

    नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नियमानुसार भरल्यानंतर ‘बेबाकी’ दाखले मिळाले होते. मात्र काही दिवसांतच त्याच खात्यांवर थकबाकी दाखवण्यात आली. या विसंगतीमुळे परळी नगरपरिषद प्रशासनातील अनागोंदी कारभारावर आणि कामकाजावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषद प्रशासनानेच दिलेल्या बेबाकीची नोंद कशाच्या आधारावर करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियमांची पडताळणी केली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्वर राजमाने यांनी केली आहे. ज्ञानेश्वर राजमाने यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, “चूक कोणाची आहे हे निश्चित करा. बेबाकी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी ठरवा.” अन्यथा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय होईल आणि प्रशासनावरील विश्वास उडेल, अशी भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ मधील विनापरवाना नळजोडण्यांचा मुद्दाही ऐरणीवर आला असून, नियमित कर भरणाऱ्यांवर कारवाई आणि नियमभंग करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का,? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणी नगरपरिषदेकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नसले तरी, नागरिकांनी पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....