इमेज
  परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...

रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या वाणीने रंगणार रामकथा; संत-महंतांच्या उपस्थितीत हरीनामाचा गजर

 केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रमात ११ ते १९ मार्च दरम्यान १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह



केज (प्रतिनिधी) :-

       केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन निमित्त दि. ११ ते १९ मार्च २०२६ दरम्यान १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञ, संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह या भव्य-दिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ११ मार्च रोजी विष्णू यागाच्या शुभारंभाने या सोहळ्याची मंगल सुरुवात होणार आहे. भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन आयोजक श्री ह. भ. प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांनी केले आहे. 

        “जगज्यपालं चालकान्द्रा महायानभीनीलका दुरावारमा सुद्यासहायम् भन्नेहं भजेऽहं ॥” श्री भगवान विष्णु हे सकल जीवांचे पालन-पोषण करणारे दैवत असून अनादि कालापासून ऋषि-मुनि यज्ञाद्वारे त्यांची आराधना करत आले आहेत. धर्मग्रंथानुसार श्री विष्णू यज्ञाने सर्व सिद्धी, इच्छापूर्ती, विवाह-शुभफल, पितृदोष निवृत्ती, दारिद्र्य नाश तसेच महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तन-मन शुद्धी, संकल्प सिद्धी व आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी हा महायज्ञ अत्यंत फलदायी मानला जातो.श्री ह. भ. प. परमपूज्य रामराव महाराज ढोक हे कथाकार असून दि. १२ मार्च ते १९ मार्च २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत संगीत रामकथा होणार आहे. महान तपस्वी परमा त्यागी श्री १०८ स्वामी चिन्मय पुरी महाराज (हिमाचल प्रदेश) यांचे या सोहळ्यास आशीर्वाद लाभणार आहेत.

   दैनंदिन कार्यक्रमसकाळी ४ ते ६ – काकडा आरती, ६ ते ७ – विष्णुसहस्त्रनाम, ७ ते १० – ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ – गाथा भजन,दुपारी २ ते ५ – संगीत रामकथा, सायं. ५ ते ७ – हरिपाठरात्री ८ ते १० – हरिकीर्तन, रात्री १० ते पहाटे ४ – हरिजागर, यज्ञ पूजा जोडीने किंवा एकट्यालाही बसता येईल. यज्ञासाठी दररोज सकाळी ८ ते ११ ही वेळ राहील, तर कीर्तन वेळ सायंकाळी ८ ते १० वाजता असेल. ज्या भाविकांना महायज्ञ पूजेस बसावयाचे आहे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून यज्ञ पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

        राज्यातील कीर्तनकारांची किर्तन होणार आहे. तर यामध्ये नावे दि. १२ मार्च – ह. भ. प. वैराग्यमूर्ती श्री ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी, दि. १३ मार्च – ह. भ. प. कूट अभंग चिंतक महादेव महाराज राऊत (बीड), दि. १४ मार्च – ह. भ. प. विनोदाचार्य केशव महाराज उखळीकर, दि. १५ मार्च – संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प. पुंडलिक महाराज देहूकर, दि. १६ मार्च – ह. भ. प. धर्माचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, दि. १७ मार्च – जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज हासेगावकर, दि. १८ मार्च – ह. भ. प. विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, दि. १९ मार्च (दुपारी १२ ते २) – रामायणाचार्य ढोक महाराज यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन

या सोहळ्यात सहभागी होऊन जीवनातील काम, क्रोध, लोभ, मोह व व्यसनांची आहुती देऊन सुख, शांती व समाधान प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सतत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नदान करू इच्छिणाऱ्या भाविकांनीही संपर्क साधावा. सोहळ्यासाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत असून संपूर्ण मंडप व जेवण व्यवस्था वॉटरप्रूफ राहणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी आश्रम परिसरालगत स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महाहाराष्ट्रासह देशभरातील संत-महंतांची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार असून बीड जिल्हा, केज तालुका व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री ह. भ. प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांनी केले आहे.संपर्क: ९८ ९० ६३ ३२ २२यज्ञ पाससाठी: श्री ह. भ. प. विष्णु महाराज – ९८ ९० ५० ५६ ६९ साधावा.

केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन निमित्त दि. ११ ते १९ मार्च २०२६ दरम्यान १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञ, संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह या भव्य-दिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची पत्रिका श्री ह. भ. प. परमपूज्य रामायणचार्य रामरावजी ढोक महाराज यांना देतांना आयोजक श्री ह. भ. प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, समाधान मुंडे, महादेव फड व आदी भक्त मंडळी उपस्थित होते. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून या दिव्य महायज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 

श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजनानिमित्त संगीत रामकथा, हरिकीर्तन व महायज्ञ सोहळ्याची भव्य तयारी

रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या वाणीने रंगणार रामकथा; संत-महंतांच्या उपस्थितीत हरीनामाचा गजर

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचा सहभाग; दररोज काकडा आरती ते हरिजागर असा दिव्य कार्यक्रम

भाविकांसाठी महाप्रसाद, वॉटरप्रूफ मंडप व पार्किंगची सुविधा; यज्ञ पूजेसाठी नोंदणीचे आवाहन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!