इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

श्री. योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांची गुप्त दान





अंबाजोगाई: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबईस्थित भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे.


योगेश्वरी देवीच्या मंदिराचे सध्याचे मुख्य शिखर शंभर वर्षांपूर्वीचे आहे. हे शिखर पूर्णपणे चुन्याच्या बांधकामात असल्याने काळाच्या ओघात ते काहीसे कमकुवत झाले होते. या ऐतिहासिक शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय योगेश्वरी देवस्थान समितीने नुकताच घेतला होता. या कामासाठी साधारण ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली.

त्यानंतर त्यांनी तातडीने आपला दूत पाठवून एक कोटी रुपयांचा धनादेश समितीच्या विश्वस्तांकडे समितीने नुकताच घेतला होता. या कामासाठी साधारण ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने आपला दूत पाठवून एक कोटी रुपयांचा धनादेश समितीच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केला. ही रक्कम बँकेत जमा झाली असून या आठवड्यापासून शिखराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. या महत्त्वाकांक्षी जिर्णोद्धार प्रकल्पासाठी तामिळनाडू येथील कुशल कारागिरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कारागीर आपल्या पारंपारिक कौशल्याने शिखरावरील अतिशय सूक्ष्म आणि देखणे नक्षीकाम पूर्ण करणार आहेत. मंदिराच्या वैभवात भर पडणाऱ्या या कामासाठी अचानक मिळालेल्या एवढ्या मोठ्या निनावी देणगीमुळे भाविकांमध्ये कुतूहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....