परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील भागवत पॅलेसच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अंबाजोगाई येथील सामाजिक व रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ.रोहिणी पाठक, सौ.स्वाती विलासराव ताटे, सौ.उत्पलवर्णा अमोल कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव केला जाणार आहे अशी माहिती सा.परळी संचारचे संपादक अनंत कुलकर्णी यांनी दिली. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे श्री कुलकर्णी यांच्यासह सौ.शितल अनंत कुलकर्णी व परळी संचार परिवाराच्या वतीने आवाहन त्यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...