इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आवहान

 जिल्ह्यात "छत्रपती शिवाजी महाराज" महसूल अभियानाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा - अनिल बोर्डे





बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आवहान

गेवराई (प्रतिनिधी) महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी ग्राहक, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नाचे तात्काळ शिबिरातून निराकरण करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात मंडळ स्तरावर  ७ व १४ मार्च २०२६ नंतर १० व१७ एप्रिल २०२६ नगरपंचायत व नगरपरिषद स्तरावर ८ व१५ मे२०२६ रोजी शिबिरे आयोजीत करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत भोगवटदार वर्ग २/ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतर, जिवंत ७/१२ मोहिमे द्वारे नोंदी दुरुस्ती, प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निपटारा सामाजिक अर्थसहाय्य योजनाचे आदेश वितरण, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप पानंद रस्त्याच्या मान्यता प्रक्रिया तसेच डिजिटल( कोड युक्त ) ७/१२ बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 

 याशिवाय लोकसेवा हक्क कायदे अंतर्गत सेवा वितरण ई-मोजणी ,अॅग्री स्टॅक, पी एम किसान योजना आदी  सेवा जनता दरबार मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महसूल कायद्यातील कलम ४२ अन्वये अ कृषीक  हस्तांतर प्रक्रियेतील सुधारणा व एक वेळ आधिमूल्याच्या नव्या दराबाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्राहकाने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवहान बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....