पोस्ट्स

इमेज
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ए यांच्या  वक्तव्याचा परळीत वकिलांकडून निषेध परळी | प्रतिनिधी...        सिरसाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे हे नागरिकांशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे वकील वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या  आहेत.संबंधित अधिकारी दहिफळे हे आरोपांना विशिष्ट वकिलच लावा अन्यथा तुमची जामीन होऊ देणार नाही म्हणून आरोपीवर दबाव टाकतात. तसेच मीच आरोपीची जामीन करतो.वाळुचे ट्रक सोडविण्यासाठी सुद्धा अमुक वकील लावा अन्यथा तुम्हाला माझ्या हद्दीत धंदा करू देणार नाही. वगैरे वकिलांच्या तक्रारीवरून परळी वकील संघाने दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी बैठक घेऊन दहिफळे याची जिल्ह्याबाहेर बदली करा म्हणून पोलीस महासंचालक मुंबई व जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे मागणी केली होती.त्याचा राग मनात धरून संपूर्ण वकिलांबाबत  व वकिलांच्या व्यवसायाबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करू लागला आहे.एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी वकिलांबाबत केलेल्या विधानांवरून वकील बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली ...

संभाजीनगर विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांना मातृशोक

इमेज
  प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र शाखेच्या सेवानिवृत्त प्रा.डॉ. हे विमलादेवी सुग्रीव काळे वय (८२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.          प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एम एस्सी करून पीएचडी मिळवली होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, आर्य समाज प्रतिनिधी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष ब्रह्ममुनि तथा प्रा.डॉ. सुग्रीव काळे यांच्या त्या पत्नी तर परळीतील अस्थिरोगतज्ञ डॉ. मधुसूदन काळे, उद्योजक विक्रम काळे व छत्रपती संभाजी नगरचे विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांच्या त्या मातोश्री होत.
इमेज
  दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा अतिरिक्त कार्यभार परळी (प्रतिनिधी) : भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथील आयुक्त सौ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून गुरुवार, ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले. राज्याचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.सध्या सौ. मुधोळ-मुंडे या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे आयुक्त म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडेच आता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महत्त्वाच्या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या महामंडळाच्या कामकाजाला यामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन जबाबदारीमुळे ऊसतोड कामगारांच्या विविध ...

अजित दादा असते तर... मुंडेंनी काढली आठवण...

इमेज
  राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यास प्राधान्य तर रोजगार निर्मितीत होणार क्रांती महाराष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर विकसित राज्य म्हणून होण्याची दूरदृष्टी दर्शविणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे यांनी केले स्वागत अजित दादा असते तर... मुंडेंनी काढली आठवण मुंबई (प्रतिनिधी) - स्व. अजितदादांच्या विकासाच्या व्हिजनला आजचा अर्थसंकल्प समर्पित करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय आज सभागृहात मांडला असून महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक अशा चार स्तंभांच्या माध्यमातून राज्याच्या चौफेर विकासाची चतुसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  २५ सप्टेंबर, २०२५ पर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान ...

सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
अभिमानास्पद: परळीच्या भूमिपुत्राचा यूपीएससीत डंका; हर्षवर्धन तिडके यांनी आयएएसमध्ये मिळवली 355 वी रँक परळी वैजनाथ :  एमबी न्यूज  वृत्तसेवा...          परळी तालुक्यातील पांगरी येथील भूमिपुत्र हर्षवर्धन अशोक तिडके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आयएएसमध्ये 355 वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परळी तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.        हर्षवर्धन तिडके हे लातूर येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी अशोक तिडके यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण लातूर येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशातील नामांकित शिक्षणसंस्था आयआयटी बाॅम्बे,पवई येथे प्रवेश घेतला आणि तेथून पदवी शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे कोणतेही ...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे - राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार  राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे  नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे सातारा येथील दरे येथे निसर्गोपचार केंद्र स्थापन केले जाईल मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल आयुष्यमान योजने 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत आजारात वाढ केली आहे महिमा संस्थेची स्थापना करणार तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल 36 नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे युनिकॉर्नमध्येही महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्रात 1 लाख 25 हाजर उद्योजक घडविणे व 50 हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे 25 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा दिली जातील आणखी 25 लाख बहिणींनी लखपतीदीदी करण्याचे उद्दिष्ट आहे 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे लाडकी बहीण योजना अशीच सुरू राह...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेचा विस्तार; शेतमजुरांनाही मिळणार आर्थिक संरक्षण मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढवून आता शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळत होता. मात्र आता शेतमजूर वर्गालाही अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेच्या विस्तारासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना अपघाती प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक व्यापक होणा...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  Maharashtra Budget 2026 : CM फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांसह नवीन योजनांची घोषणा केली आहे. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार आहे. याकरिता २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!