संभाजीनगर विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांना मातृशोक

 प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांचे निधन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
           येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र शाखेच्या सेवानिवृत्त प्रा.डॉ. हे विमलादेवी सुग्रीव काळे वय (८२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
         प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एम एस्सी करून पीएचडी मिळवली होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, आर्य समाज प्रतिनिधी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष ब्रह्ममुनि तथा प्रा.डॉ. सुग्रीव काळे यांच्या त्या पत्नी तर परळीतील अस्थिरोगतज्ञ डॉ. मधुसूदन काळे, उद्योजक विक्रम काळे व छत्रपती संभाजी नगरचे विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!