जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..
अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे -
राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार
राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे
नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे
त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे
सातारा येथील दरे येथे निसर्गोपचार केंद्र स्थापन केले जाईल
मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे
महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल
आयुष्यमान योजने 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत आजारात वाढ केली आहे
महिमा संस्थेची स्थापना करणार
तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल
36 नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल
महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे
युनिकॉर्नमध्येही महाराष्ट्र अव्वल
महाराष्ट्रात 1 लाख 25 हाजर उद्योजक घडविणे व 50 हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे
25 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा दिली जातील
आणखी 25 लाख बहिणींनी लखपतीदीदी करण्याचे उद्दिष्ट आहे
6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे
लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी समिती गठीत केली आहे
30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार
समितीच्या शिफारशी निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील
अनुसुचित जातींसाठी 2026-27 मध्ये 23 हजार 150 कोटी रुपये नियतव्यय
आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21 हजार कोटी रुपये प्रस्तावित
अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार. त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचे जाहीर केली.
अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला
श्रद्धांजली म्हणून भव्य स्मारक उभारण्यात येईल
त्याच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल.
दिवंगत अजितदादा यांना अर्थसंकल्प अर्पण.
2026 - 2027 वर्षांत महात्मा फुलेंच्या 200 व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबविले जाणार. त्यासाठी निधीची तरतूद करणार.
संत गाडगेबाबांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार.
ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येणार
75 गावांत AI च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प राबविणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनिमित्त कार्याचा गौरव करून आवश्यक निधी उपलब्ध करणार
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील राष्ट्रीय स्मारकाचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करत आहोत.
त्यांच्या स्मृति निमित्ताने योजना सुरु करत आहोत.
अजित पवार आज आपल्यात नाही
कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे
अजित पवार व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते
कठिण काळात आर्थिक शिस्तीमुळे स्थिर राहिली
त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल
गतीमान नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येईल
आजचा अर्थसंकल्प त्यांना समर्पित करतो
16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे
सहाव्या वित्त आयोगाचा स्थापना राज्य सरकारने केली होती
त्यांचा अहवाल राज्यपालांच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल
1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला
मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो
विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल
राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे
प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अशीच सुरु राहणार
भरीव तरतूद केली जाईल. आम्हीच पूर्ण करणार, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
37 लाख लखपती दीदी झाल्या
चार केंद्रांखाली 16 उपकेंद्र ठरवले आहेत
प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल
शेरोशायरीमधून मुख्यमंत्र्यांचे सादरीकरण
कृषी व ग्रामीण विकास
बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल
30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचाही समावेश करणार
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23 हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील
123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे
महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे
इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत
50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल
सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय करण्याची घोषणा करत आहे
गोपिनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
30 हजार किलो मीटरहून जास्त कामं झाली आहेत
टप्पा 3 मध्ये 23 हजार किमी रस्त्याची व पुलाची कामं करणार आहेत
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे
प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील
मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील
महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे
4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे
निवडक 50 पर्यटन स्थळी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल
वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे
राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल
चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य करणार
5 ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहे
त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल
शाश्वत विकासासाठी सक्षम प्राधिकरण स्थापन करणार
वाहतूक केंद्रीच विकास व 100 टक्के डिजिटायझेशन करणार
300 अब्ज डॉलरचे उद्देश
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम 2027 पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल
तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
चौथी मुंबई वाढवण येथे होईल. एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील
2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील
दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत
वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे
पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार
1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लातूर, बारामती येथे रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल
मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटरपर्यंत वाढवणार
1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल
2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे
32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च
यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे
राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल
राज्य जल माहिती केंद्र सुरु केले जाईल
नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल
राज्यातील शहरांमध्ये 5 हजार 860 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे
सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे उद्दिष्ट आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा