महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

 दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा अतिरिक्त कार्यभार





परळी (प्रतिनिधी) : भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथील आयुक्त सौ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

या संदर्भातील आदेश राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून गुरुवार, ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले. राज्याचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.सध्या सौ. मुधोळ-मुंडे या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे आयुक्त म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडेच आता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महत्त्वाच्या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या महामंडळाच्या कामकाजाला यामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन जबाबदारीमुळे ऊसतोड कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजन अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....