सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ए यांच्या वक्तव्याचा परळीत वकिलांकडून निषेध
परळी | प्रतिनिधी...
सिरसाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे हे नागरिकांशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे वकील वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.संबंधित अधिकारी दहिफळे हे आरोपांना विशिष्ट वकिलच लावा अन्यथा तुमची जामीन होऊ देणार नाही म्हणून आरोपीवर दबाव टाकतात. तसेच मीच आरोपीची जामीन करतो.वाळुचे ट्रक सोडविण्यासाठी सुद्धा अमुक वकील लावा अन्यथा तुम्हाला माझ्या हद्दीत धंदा करू देणार नाही. वगैरे वकिलांच्या तक्रारीवरून परळी वकील संघाने दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी बैठक घेऊन दहिफळे याची जिल्ह्याबाहेर बदली करा म्हणून पोलीस महासंचालक मुंबई व जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे मागणी केली होती.त्याचा राग मनात धरून संपूर्ण वकिलांबाबत व वकिलांच्या व्यवसायाबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करू लागला आहे.एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी वकिलांबाबत केलेल्या विधानांवरून वकील बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यामुळे वकिलांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेवर आरोप केला आहे.
वकिलांना कायद्याने कोर्टचा अधिकारी संबोधले जाते.कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांची अशा प्रकारे बदनामी करणे तसेच त्यांच्यावर सार्वजनिकरित्या आरोप करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया काही वकील बांधवांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत परळी वकील संघाने ठराव घेऊन निषेध व्यक्त केला व दहिफळे याची जिल्ह्याबाहेर तडफातडफी बदली करावी अन्यथा आंदोलन करणयाची भुमिका घेतली आहे. याकडे सर्व जिल्हाभरातील वकिलांचे लक्ष लागले आहे.
या प्रसंगी परळी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड धनाजी कांबळे ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड जीवनराव देशमुख ॲड मिर्झा मंजुर ॲड लक्षमण अघाव ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड प्रकाश मराठे ॲड वसंतराव फड ॲड दस्तगीर ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड नागापूरकर ॲड बी डी उजगरे ॲड मोहन कराड ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड कल्याण सटाले ॲड मार्तँड शिंदे ॲड लक्ष्मण गित्ते ॲड जगन्नाथ आंधळे ॲड ज्ञानोबा मुंडे ॲड सुनिल सोनपीर ॲड दिनकर वाघमोडे ॲड राहुल सोळंके ॲड दत्तात्रय कराड ॲड प्रविण फड ॲड अतिष पोतदार ॲड बालाजी कराड ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव ॲड उमेश घोडके ॲड शहेबाज पठाण ॲड शहाणे ॲड सुल्तान ॲड एस बी कांबळे ॲड बालाजी फड, ॲड सुनील राठोड,ॲड नंदकुमार राठोड इत्यादींनी भाग घेतला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा