महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

सर्व स्तरातून अभिनंदन....

अभिमानास्पद: परळीच्या भूमिपुत्राचा यूपीएससीत डंका; हर्षवर्धन तिडके यांनी आयएएसमध्ये मिळवली 355 वी रँक






परळी वैजनाथ :  एमबी न्यूज  वृत्तसेवा...

         परळी तालुक्यातील पांगरी येथील भूमिपुत्र हर्षवर्धन अशोक तिडके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आयएएसमध्ये 355 वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परळी तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       हर्षवर्धन तिडके हे लातूर येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी अशोक तिडके यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण लातूर येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले.

उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशातील नामांकित शिक्षणसंस्था आयआयटी बाॅम्बे,पवई येथे प्रवेश घेतला आणि तेथून पदवी शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे कोणतेही स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लास न लावता स्वतःच्या जिद्द, परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि या कठीण स्पर्धेत यश संपादन केले.हर्षवर्धन तिडके यांच्या या यशामुळे परळी तालुका आणि बीड जिल्ह्याचा अभिमान वाढला असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....