पोस्ट्स

ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

इमेज
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ...

ना पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उर्वरित काम पूर्णत्वास घेऊन जाणार...

इमेज
  परळीतील भगवान विश्वकर्मा मंदिर : माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केली पूजा व आरती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ नगरी परळी वैजनाथ येथील  भगवान विश्वकर्मा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्ताने माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी  उपस्थित राहून भगवान विश्वकर्मा यांची पूजा व आरती केली.            यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित भाविक बांधवांना शुभेच्छा देताना सांगितले की, सृष्टीचे दिव्य शिल्पकार व निर्माणकलेचे अधिष्ठाता भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती नांदो, हीच प्रार्थना आहे.मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात  भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक विधी, पूजा-अर्चा व आरतीच्या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला...

मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार

इमेज
  राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान 23 एप्रिलला तर  4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.  निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.  मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.  दर...
इमेज
  मेट्रो भवनाचे उदघाटन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले. पुणे मेट्रोच्या कामाची गती ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो कामांपैकी एक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मेट्रो टीमचे कौतुक केले. मेट्रो भवन हे केवळ एक कार्यालय नसून, मेट्रोच्या स्वयंचलित सिग्नलिंग, कमांड अँड कंट्रोल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हृदय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी अशा प्रकारच्या सुसज्ज इमारतीची नितांत गरज होती, जी आज पूर्ण झाली आहे. पुणेकरांनी मेट्रोचा उदंड प्रतिसाद दिला असून, दैनंदिन प्रवाशांची संख्या 2.5 लाखांच्या पार गेली आहे. विशेषतः गणेशोत्सवात एकाच दिवशी पावणे सहा लाख प्रवाशांनी प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला. हा ओघ पाहता, मुख्यमंत्री यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्ष...

बेरोजगारांना रोजगाराची संधी....

इमेज
  दिनांक 17 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिना  निमित्त  ‍जिल्हयातील पंडित दीनदयाल उपाध्याय  रोजगार मेळावा       बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड मार्फत दिनांक 17 मार्च  2026 रोजी  सकाळी 10.30 वा  तुलसी संगणकशास्ञ व माहितीतंत्रज्ञान महाविदयालय डी.पी.रोड बीड  येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  सदर मेळाव्यामध्ये पुढिलप्रमाणे नांमाकित कंपनीच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत.  *एल आय सी बीड* येथे    1)  विमा सखी  एकूण पदे 15 शैक्षणिक पात्रता- 10 वी किंवा 12 वी/पदवी वयोमर्यादा-18 ते 40        जॉब लोकेशन-बीड  गोविंदाज  प्रा.लिमिटेड नाशिक येथे ट्रेनी  या पदाची एकुण पदे-30 शैक्षणिक पात्रता- 12 वी/पदवी   वयोमर्यादा- 18 ते 35  जॉब लोकेशन- छ.संभाजी नगर/बीड/पुणे ब्रिजयोग टोय...

वाढत्या चोऱ्या,- पोलिसांसमोर आव्हान

इमेज
  परळीत जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी; पाच लाखांचा ऐवज लंपास परळी वैजनाथ: शहरातील जुन्या थर्मल कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ४ लाख ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. [1, 2] परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तंत्रज्ञ अशोक गुंडू पाटील हे जुन्या थर्मल कॉलनीतील एफ-६ (क्वार्टर क्र. ४२५/४२६) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील आठ दिवसांपूर्वी गावी गेल्यामुळे शेजारील क्वार्टर क्रमांक ४२५ बंद होते. हीच संधी साधून १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, मणी, मिनी गंठण, मंगळसूत्र यांसह चांदीचे लिंग, मूर्ती आणि चैन असा एकूण ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १४ मार्च रोजी सकाळी ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याच रात्री चोरट्यांनी कॉलनीतील इतर काही घरांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलीस निरीक्षक धन...
इमेज
  कु.अवनी मोगरकरचे ऑलिम्पियाड परीक्षेत यश परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गणेशपार भागातील ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अवनी अश्विन मोगरकर हीने ऑलिम्पियाड परिक्षेत सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आहे.कु.अवनी ही नगरसेविका सौ.जयश्री मोगरकर यांची नात आहे.    इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या ऑलिपियाड स्पर्धात्मक परीक्षा आहेत.या परीक्षा गणित, विज्ञान,इंग्रजी आणि तर्कशक्ती यांसारख्या विषयांमधील विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य तपासतात.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे,गणित,विज्ञान, इंग्रजी,कॉम्प्युटर आणि सामान्य ज्ञान ही ऑलिम्पियाड परीक्षेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास वाढतो, विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारतात आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी पाया तयार होतो.या ऑलिम्पियाड परिक्षेत ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या कु.अवनी अश्विन मोगरकर हीने सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आ...

परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

इमेज
  मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांचा जाहीर सत्कार करणार - आ. धनंजय मुंडे परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करा, अतिक्रमणे आणि अपिलांची प्रकरणे सोडवण्यासाठी मिळून प्रयत्न करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना उत्पादित शेतीमालाला ताजी बाजारपेठ मिळवून देण्यासह स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून परळी मतदारसंघातील प्रत्येक शेत / पाणंद पक्क्या रस्त्याने जोडण्याचे आपले उद्दीष्ट असून,  यासाठी मनरेगासह जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जास्तीत जास्त कामे प्रस्तावित केली जावीत. या निधी बरोबरच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून, ही योजना 100% यशस्वीपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायती तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आपण जाहीर सत्कार करणार असल्याची भावना माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील एका बैठकीत बोलून दाखवली.  परळी वैजनाथ विधानसभा मतदा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!