कु.अवनी मोगरकरचे ऑलिम्पियाड परीक्षेत यश



परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील गणेशपार भागातील ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अवनी अश्विन मोगरकर हीने ऑलिम्पियाड परिक्षेत सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आहे.कु.अवनी ही नगरसेविका सौ.जयश्री मोगरकर यांची नात आहे.

   इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या ऑलिपियाड स्पर्धात्मक परीक्षा आहेत.या परीक्षा गणित, विज्ञान,इंग्रजी आणि तर्कशक्ती यांसारख्या विषयांमधील विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य तपासतात.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे,गणित,विज्ञान, इंग्रजी,कॉम्प्युटर आणि सामान्य ज्ञान ही ऑलिम्पियाड परीक्षेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास वाढतो, विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारतात आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी पाया तयार होतो.या ऑलिम्पियाड परिक्षेत ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या कु.अवनी अश्विन मोगरकर हीने सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आहे.याबद्दल तिचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!