इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांचा जाहीर सत्कार करणार - आ. धनंजय मुंडे




परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा


जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करा, अतिक्रमणे आणि अपिलांची प्रकरणे सोडवण्यासाठी मिळून प्रयत्न करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना उत्पादित शेतीमालाला ताजी बाजारपेठ मिळवून देण्यासह स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून परळी मतदारसंघातील प्रत्येक शेत / पाणंद पक्क्या रस्त्याने जोडण्याचे आपले उद्दीष्ट असून,  यासाठी मनरेगासह जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जास्तीत जास्त कामे प्रस्तावित केली जावीत. या निधी बरोबरच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून, ही योजना 100% यशस्वीपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायती तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आपण जाहीर सत्कार करणार असल्याची भावना माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील एका बैठकीत बोलून दाखवली. 

परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनेतून प्रस्तावित कामांचा धनंजय मुंडे यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रमुख पदाधिकारी व विविध गावच्या सरपंच, उपसरपंच आदींच्या उपस्थितीत सविस्तर आढावा घेऊन व्यापक चर्चा केली. 

शेत / पाणंद रस्त्यांच्या प्रस्तावित कामांमध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमणे किंवा अपिल आहेत अशी प्रकरणे तातडीने सोडवावीत यासाठी एक विशेष कृती कार्यक्रम तयार करावा, तसेच अडचणीची अपिले किंवा अतिक्रमणे निकाली काढण्यासाठी आवश्यक तिथे आपणही स्थानिक ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मदत करू, असेही धनंजय मुंडे या बैठकीत म्हणाले. 

प्रत्येक गावातील कामे प्रस्तावित करताना संबंधित गावचे सरपंच तसेच प्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, शिवाजीराव शिरसाट, राजाभाऊ पोळ, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, प्र. तहसीलदार विलास तरंगे, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले यांसह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या