दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण

इमेज
कडक उन्हात ना. पंकजा मुंडे चार दिवस विदर्भ दौऱ्यावर ; शासकीय बैठका, लोकार्पण आदी भरगच्च कार्यक्रम पशूचिकित्सालयाचे केळझर येथे भूमीपूजन तर सेलडोह येथे लोकार्पण पशूपालकांचे नुकसान होणार नाही याची सरकार काळजी घेईल ; जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्यासाठी प्रयत्न पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक वर्धा, दि.१५ -- कडक उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना अशा वातावरणात  राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे मात्र पशूपालकांसाठी सरसावल्या आहेत. आजपासून चार दिवस त्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्या वर्धा इथे होत्या. जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरुपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.    जिल्हाधिकारी कार्यालयात पशुप...

स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात - विलास ताटे 





परळी वै. प्रतिनिधी -

    स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे. 

नंदागौळ रोडवरील परळी आर्यसमाज अंतर्गत स्वामी श्रध्दानंद गुरुकुल येथे विद्यार्थ्यांना शिक्षण, भारतीय संस्कृतीचे धडे, व्यायाम, आहारविहार विषयी मार्गदर्शन केल्या जाते. शिवाय या ठिकाणी स्त्री-पुरुष यांच्यावर चांगल्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात पंचकर्म केले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेकांचा ओढा दिसुन येतो. विशेष म्हणजे आजही विज्ञानमुनी नाडी परिक्षा करुन अनेकांना योग्य ते मार्गदर्शन करतात. येथील सत्येंद्रजी आचार्यजी विद्यार्थ्यांना केवळ आदेशच न देता स्वतःही काम करतात या गुरुकुलवर पूर्ण नियंत्रण आर्यसमाजचे प्रधान जुगलकिशोर लोहिया यांचे व त्यांचे सर्व सहकारी इत्यादींचे असते. हे येथील वाखण्याजोगी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडवतात त्यामुळे येथुन बाहेर निघणारा विद्यार्थी निव्यर्सनी, सुसंस्कारीत व आरोग्य संपन्न असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....