इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण

कडक उन्हात ना. पंकजा मुंडे चार दिवस विदर्भ दौऱ्यावर ; शासकीय बैठका, लोकार्पण आदी भरगच्च कार्यक्रम




पशूचिकित्सालयाचे केळझर येथे भूमीपूजन तर सेलडोह येथे लोकार्पण


पशूपालकांचे नुकसान होणार नाही याची सरकार काळजी घेईल ; जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्यासाठी प्रयत्न


पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक

वर्धा, दि.१५ --

कडक उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना अशा वातावरणात  राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे मात्र पशूपालकांसाठी सरसावल्या आहेत. आजपासून चार दिवस त्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्या वर्धा इथे होत्या.

जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरुपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.   

जिल्हाधिकारी कार्यालयात पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.जगदीश बुकतरे यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी आणि चाऱ्याअभावी पशुंचे स्थलांतरण करावे लागू नये. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या लावल्या जातात. त्याच धर्तीवर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरण केले जाते, तेथे गावाशेजारीच पाण्याची व्यवस्था बघून कायमस्वरुपी छावण्या उभ्या राहिल्या तर आपण स्थलांतरण थांबवू शकू. त्यामुळे यासाठी काय करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ठिकठिकाणी गाईंचे क्लस्टर उभे राहात आहे. विशिष्ठ गाईंना विशिष्ट वातावरण लागते. त्यामुळे जिल्ह्यात गाईंचे क्लस्टर तर कराच शिवाय येथले वातावरण पाहता शेळींचे क्लस्टर केले तर शेतकरी व पशुपालकांना अधिक फायदा होईल. अशा क्लस्टरसाठी पशुसंवर्धन विभागाचे काही सहकार्य लागल्यास उपलब्ध करून देऊ. यासाठी सचिवांना निर्देश देण्यासह अधिकाऱ्यांना यात पुढाकार घेण्यासाठी निर्देश देऊ, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

देशी गायींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र बैठक घेऊ

--------

वर्धा जिल्ह्यात गवगाऊ ही उत्तम दर्जाची देशी गाय आहे. परंतू गेल्या काही वर्षात या गाईंची संख्या कमी होत आहे. या गाईचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व काही पशुपालकांनी बैठकीत व्यक्त केले. या गाईच्या संवर्धनासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. यासाठी काय धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात पशुधन व दुग्धव्यवसाय वाढविण्यासाठी विविध विभागाच्या सहकार्याने चांगले काम करू, असे ही त्यांनी सांगितले.

दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण

-----

जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेतून वर्ग 1 ते 10 पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थीनींना 25 हजार रुपयांचे किसान विकास पत्र देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मंत्री पंकजा मुंडे व पालकमत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. सेसफंड योजनेतूनच दिव्यांगांना स्कुटीचे  चाव्या देऊन वितरण करण्यात आले.

पशुचिकित्सालयाचे लोकार्पण 

-----

सिध्दी विनायक गणपती मंदिर केळझर येथील सांस्कृतिक सभागृह येथे केळझर येथील पशुचिकित्सालयाचे भूमीपूजन, सेलडोह येथील पशुचिकित्सालयाचे लोकार्पण, ग्राम पंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्राचे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध लाभाचे वाटप यावेळी ना. पंकजाताईंच्या हस्ते झाले.ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचवणे आणि पशुधनाचे रक्षण करणे हाच या कामांचा मुख्य उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या