वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण

इमेज
  परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           येथील  बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.           परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घड...

परळीत भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू;  ट्रक चालकावर गुन्हा दाखल



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
      परळी ते गंगाखेड रोडवरील उड्डाणपुल परिसरात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सुधाकर सटाले (वय २९, रा. तडोळी, ता. परळी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी  माणिक रामकृष्ण सटाले यांनी फिर्याद दिली आहे.
शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास परळी ते गंगाखेड रोडवरील एकमिना चौक ते उड्डाणपुल दरम्यान हा अपघात घडला. आरोपी ट्रक चालक दाऊद मोहम्मद शेख (रा. मलीकपुरा, परळी) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH44 U 0619) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. या ट्रकने सचिन याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे सचिनचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर  पोलिसांनीट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....