इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण

 परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
          येथील  बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.
          परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घडत आहेत.
वाहतुकीची प्रचंड कोंडी...
         बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावरच खासगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होते. शहरातील मुख्य  हा रस्ता असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागतात. 'त्या' विशिष्ट थांब्यावर गाड्या उभ्या करून प्रवासी भरले जात असल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष....
        एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे सांगितले जाते, मात्र बसस्थानकाच्या नाकावरच खासगी वाहतूक फोफावत असताना प्रशासन काय करत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्रस्त नागरिक करत आहेत.

नागरिकांची मागणी....
"बसस्थानकासमोर उभ्या राहणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा थांबा मोकळ्या जागेत किंवा रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी हलवण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल," अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आता यावर संबंधित विभाग काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या