वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण

इमेज
  परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           येथील  बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.           परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घड...

 ठेकेदाराचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर; पाटोदा पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

         पाटोदा ते जामखेड रोडवर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून २५ वर्षीय शुभम प्रभाकर नेटके (रा. आसरडोह, ता. धारुर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

          धनगर जवळका येथे बी.आर.एन. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत पुलाचे काम सुरू आहे, मात्र तिथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा फलक, बॅरिकेटींग किंवा रिफ्लेक्टर लावलेले नव्हते. २३ मार्च रोजी पहाटे शुभम आपल्या दुचाकीवरून जात असताना अंधारात खड्डा न दिसल्याने तो थेट खड्ड्यात कोसळला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. कंपनीचे गुत्तेदार संजयकुमार गुप्ता आणि लवकुश चौधरी यांना धोक्याची कल्पना असूनही त्यांनी सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका ठेवत अक्षय नेटके यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....