८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक
पुणे (खराडी):
दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा