इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...

भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा -डॉ. संतोष मुंडे

                             भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक

परळी: (प्रतिनिधी)...

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत ८ दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आलेले आहे.

दिनांक १४ एप्रिल ते २१ एप्रिल असे आठ दिवस सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिरामध्ये दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती या शिबिराचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री आ.धनंजय मुंडे तसेच ना.पंकजाताई मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री ना.अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षणी  प्रथम प्राधान्याने प्रयत्न करणारे तसेच  विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे प्रसंगी दिव्यांगाच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे,

 दिव्यांगांचे कैवारी अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्य  दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष  तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामुळे दिव्यांगांच्या जीवनात एक आर्थिक आधाराचा  आणि आनंदाचा प्रकाश झोत येणार आहे.

या शिबिरांतर्गत दिव्यांग सहाय्यक पोर्टल मध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक दिव्यांग नागरिकाला विविध शिष्यवृत्ती योजना, सहाय्यक उपकरणे, स्वयंरोजगार कर्ज,प्रशिक्षण आणि रोजगार, आरोग्य विमा सुविधा तसेच महामंडळ योजना अशा विविध योजनांचा लाभ घेता येईल अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना देण्यात आली

दरम्यान ज्या दिव्यांग नागरिकांची या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मध्ये नोंदणी होईल त्यांनाच भविष्यातील पंधरा हजार रुपये किमतीच्या साहित्य वाटपाचा  आणि विविध योजनांचा लाभ घेता येईल अशीही महत्वाची सूचना देण्यात आली.  

   तरी परिसरातील दिव्यांग बांधवांनी आज पासून सुरू होणाऱ्या या मोफत दिव्यांग सहायक पोर्टल नोंदणी शिबिरामध्ये सहभागी होऊन श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित राहून आपल्या नावाची नोंदणी करावी  असे आव्हान या शिबिराचे मुख्य आयोजक दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....