इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

दिव्यांग सहाय्यक पोर्टल मधील नोंदणी २१ तारखेपर्यंत सुरू राहणार - डॉ.संतोष मुंडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब पौळ रामेवाडी यांच्या हस्ते उद्घाटन 





दिव्यांग सहाय्यक पोर्टल मधील नोंदणी २१ तारखेपर्यंत सुरू राहणार  - डॉ.संतोष मुंडे

परळी(प्रतिनिधी):

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे आज मौजे रामेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्री बाबासाहेब उत्तमराव पौळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.   

याप्रसंगी प्रथम दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचे मुख्य आयोजक महाराष्ट्र दिव्यांग कल्याण अभियानाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे तसेच विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.

दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच भविष्यात मिळणाऱ्या भक्कम आर्थिक आधारासाठी या दिव्यांग सहायक पोर्टल  मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण अभियानाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री आ.धनंजय मुंडे तसेच मा.ना.पंकजाताई मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री ना.अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षणी  प्रथम प्राधान्याने प्रयत्न करणारे तसेच  विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे  दिव्यांगांचे कैवारी अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्य  दिव्यांग कल्याण अभियानाचे उपाध्यक्ष  तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामुळे दिव्यांगांच्या जीवनात एक भक्कम आर्थिक आधार मिळणार आहे.

अशा या दिव्यांग सह्यायक पोर्टल मधे  दिनांक १४ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीमध्ये  दिव्यांग बांधवांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे आणि शिबिराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी पोर्टल मध्ये आपली नोंदणी करून घेतली आहे.

दरम्यान शिबिरातील सहभागी दिव्यांना मार्गदर्शन करताना शिबिराचे मुख्य आयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी या दिव्यांग सहाय्यक पोर्टल चे महत्व सांगितले तसेच ही नोंदणी २१ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आणि  दिव्यांग सहायक पोर्टल मधील नोंदणीपासून एकही दिव्यांग वंचित राहिला नाही पाहिजे असे आव्हानही केले 

या शिबिरांतर्गत दिव्यांग सहाय्यक पोर्टल मध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक दिव्यांग नागरिकाला विविध शिष्यवृत्ती योजना, सहाय्यक उपकरणे, स्वयंरोजगार कर्ज,प्रशिक्षण आणि रोजगार, आरोग्य विमा सुविधा तसेच महामंडळ योजना अशा विविध योजनांचा लाभ घेता येईल अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना देण्यात आली

दरम्यान ज्या दिव्यांग नागरिकांची या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मध्ये नोंदणी होईल त्यांनाच भविष्यातील पंधरा हजार रुपये किमतीच्या साहित्य वाटपाचा  आणि विविध योजनांचा लाभ घेता येईल अशीही महत्वाची सूचना देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट