पोस्ट्स

मे २४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश स्वतः भेट घेण्याची दाखवली तयारी ; जरांगे पाटील यांनी  कडक उन्हात उपोषणास बसणे प्रकृतीसाठी योग्य नाही मुंबई दि. ३० -- मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कडक उन्हात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्यावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.     ना. पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. ना. पंकजाताई म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी श्री मनोज जरांगे पाटील भर उन्हात जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकारी जिल्हयाच्या प्रशासनाचे प्रमुख असतात, या नात्याने आपण त्यांची तात्काळ भेट घ्यावी अशी माझी सूचना आहे. अशा कडक उन्हात त्यांचं आमरण उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. स्वतः भेटण्याची दाखवली तयारी       जिल्हयाची पालकमंत्...

चार राज्यांतून भाविकांची हजेरी...१६ जूनपर्यंत चालणार धार्मिक सोहळा

इमेज
  श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज  'लघु आळंदी' येवती येथे अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम; हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळी महाप्रसादाचा आस्वाद!  ​महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून भाविकांची अलोट गर्दी ​अमोल जोशी / अधिकमास विशेष.....                मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र व 'लघु आळंदी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवती येथील श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येथे अधिक महिन्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त गुरुवारी आयोजित महाप्रसादात सुमारे हजारो भाविकांनी तूप-पुरणपोळीचा आस्वाद घेतला. महाराजांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मठात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. ​येवती येथील या पवित्र संस्थानात श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांची जागृत संजीवन समाधी आहे. अधिक महिन्यानिमित्त मठाधिपती श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रोज विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. या...
इमेज
  परळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिंडी रथयात्रेचे उत्साहात स्वागत नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती  परळी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दिंडी रथयात्रेचे २७ मे रोजी परळी शहरात भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीतील भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले असून दिंडीचा मुक्काम श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे झाला. श्री संत जगमित्र नागा मंदिरात नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन व आरती करण्यात आली. दिंडी आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. २७ ते ३१ मे दरम्यान आयोजित ही दिंडी रथयात्रा श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रा (ता. लोहा, जि. नांदेड) येथून प्रारंभ होऊन श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे पोहोचणार आहे. रथयात्रेचा पुढील प्रवास २८ मे रोजी परळीहून अंबाजोगाई, डिघोळ अंबा, चंदन सावरगाव व कुंबेफळ-केज मार्गे होणार आहे. त्यानंतर ...

दुःखद वार्ता...

इमेज
  गणेश कदम यांचे यांचे  निधन अंबाजोगाई: येथील व्यावसायिक तथा नगरसेवक महेश कदम व अनंत कदम यांचे बंधू गणेश जगन्नाथराव कदम यांचे २९ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या धक्कादायक बातमीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  गणेश कदम यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच ३० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता बोरूळ तलाव स्मशानभूमी, अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.
इमेज
बरकतनगर भागात सरस्वती नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; नगर परिषदेची मान्सूनपूर्व तयारी वेगात! माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी :    आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पूरस्थिती, पाण्याचा अडथळा आणि अस्वच्छतेचा त्रास होऊ नये यासाठी परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत बरकतनगर येथील स. नं. ७५ भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीची मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. मानसूनपूर्व सुरू असलेल्या या कामांची माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यासह त्या प्रभागातील संबंधित नगरसेवक व न. प.पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.        या मोहिमेअंतर्गत नदीपात्रातील गाळ, कचरा, झुडपे तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारे घटक हटविण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, गती आणि स्वच्छतेबाबत आवश्...
इमेज
खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन परळीकरांच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले स्वागत  परळी वैजनाथ, प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते तथाखासदार डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी आज श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाल्याबद्दल तमाम परळीकरांच्या वतीने त्यांचा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला.        दर्शनानंतर खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रभू वैद्यनाथांच्या चरणी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. शिंदे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. परळी वैजनाथ येथे  आपण यापूर्वीही दर्शनाला आलो होतो. प्रभू वैज...
इमेज
पुणे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन ; परळीकरांच्या वतीने उत्साहात स्वागत  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :      पुणे नगरीचे माजी महापौर तथा विद्यमान पुणे महापालिका सदस्य आणि पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज परळी वैजनाथ येथे भेट देऊन पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.        परळी वैजनाथ ही अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीची नगरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या विविध भागांतून भाविक प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. या प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप यांनी परळी नगरीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक वाटचालीचे कौतुक केले. तसेच येथील नागरिकांनी दाखविलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह ज्येष्ठ नेते पत्रकार जी.एस.सौंदळे, युवक नेते दीपक तांदळे, चेतन सौंदळे, नगरसेवक सचिन सारडा, कैलास तांदळे, प्रणव परळीकर आदिशह ...
इमेज
शिवाजी शिंदे यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; हल्ल्याचे कारणही आले पुढे परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... येथील मोंढा मार्केट भागातील 'रिद्धी-सिद्धी' हॉटेलवर किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने (कत्तीने) जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्ल्यात शिवाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी आता संभाजी नगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शंकरराव शिंदे (वय ५०, रा. वडगावदाडाहरी, ता. परळी) यांचे मोंढा मार्केट परळी येथे 'रिद्धी-सिद्धी' हॉटेल आहे. त्यांच्या मुलाचे आरोपी गजानन सुरवसे याच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीकडून हा हल्ला करण्यात आला. २६ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन सुरवसे आणि त्याची आई हॉटेलवर आले. आरोपी गजानन याने सोबत आणलेल्या तीक्ष्ण कोयत्याने (कत्तीने) शिवाजी शिंदे यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या उजव्या हाताच्या बोटावर,...

“झुरळ दिसलं की मारायचं”... पण इथे केला जातो नमस्कार!

इमेज
“काॅक्रोच जनता पार्टी” सध्या सर्वत्र  ट्रेण्डमध्ये; पण परळीत शेकडो वर्षांपासून  झुरळांना आहे देवत्वाचा दर्जा! सध्या सोशल मीडियावर “काॅक्रोच जनता पार्टी” हा शब्दप्रयोग जबरदस्त ट्रेण्ड होत आहे. राजकीय टोलेबाजी, मीम्स आणि व्हायरल पोस्टमधून झुरळांचा उल्लेख उपरोधिक पद्धतीने केला जात असताना, दुसरीकडे परळी वैजनाथ शहरात असे एक मंदिर आहे जिथे शेकडो  वर्षांपासून झुरळांना चक्क देवत्वाचा दर्जा दिला जातो! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरच्या पावन भूमीत वसलेले झुरळे गोपीनाथ मंदिर हे सुमारे ३०० वर्षांपुर्वीचे मंदिर सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. कारण येथे झुरळांना क्षुल्लक समजून  दुर लोटले जात नाही तसेच केवळ सहन केले जात नाही, तर त्यांच्याकडे “गोपिकांचे रूप” म्हणून पाहिले जाते. आणि देवस्वरुप समजले जाते. “झुरळ दिसलं की मारायचं”... पण इथे नमस्कार केला जातो!       सामान्यतः घरात झुरळ दिसले की लोकांचा पहिला प्रयत्न असतो तो ते मारण्याचा किंवा बाहेर हाकलण्याचा. मात्र परळीतील या मंदिरात चित्र पूर्णपणे उलट आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात, मूर्तीभोवती आणि भिंत...

मोठा झटका :अनेक वर्षांची ओळख पुसली....

इमेज
मोठा झटका :अनेक वर्षांची ओळख पुसली; परळीतील 'बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय' अखेर परभणीला स्थलांतरित १ जूनपासून नवीन मुख्यालयातून कामकाज होणार सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी....   गेल्या अनेक वर्षांपासून परळी वैजनाथ येथे कार्यरत असलेले 'अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ' हे महत्त्वाचे कार्यालय अखेर परभणी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतराबाबतच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या यापूर्वी सातत्याने प्रकाशित झाल्या होत्या. मात्र, अखेर परळीकरांना या महत्त्वाच्या कार्यालयाला मुकावे लागले आहे,      गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मंडळांच्या आणि विभागीय कार्यालयांच्या मुख्यालयांमध्ये प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, १ जून २०२६ पासून नवीन ठिकाणाहून कामकाज सुरू होणार आहे. परळी वैजनाथ येथील 'अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ' हे कार्यालय या भागातील सिंचन आणि पाटबंधारे प्रकल्पांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. हे कार्यालय येथून हलवले जाणार असल्याचे सं...

विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

दोन आरोपींवर गुन्हा दाखल

इमेज
  कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २ लाख ६५ हजारांच्या आठ गायींची पोलिसांकडून सुटका माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल माजलगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या आठ गोवंशीय गायींची माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सुटका करत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील मनूर वस्ती भागात काही गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मुदीराज व सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी अन्वर कुरेशी व सादेक जावेद यांनी आठ गोवंशीय गायी अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून ठेवल्याचे उघड झाले. तसेच जनावरांना चारा-पाणी न देता उपाशी अवस्थेत बांधून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ आठही गायी ताब्यात घेत त्यांची सुटका केली. याप्रकरणी ...
इमेज
  रात्री दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या महिलेचा विनयभंग केज:- लाईट नसल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून एक महिला व तिच्या दोन मुली झोपलेल्या असताना मध्यरात्री त्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. दि. २२ मे रोजी रात्री लाईट नसल्यामुळे केज शहरातील एका उपनगरात राहत असलेली एक विविहित महिला ही तिच्या दोन मुलीना सोबत घेऊन घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्या होत्या. त्यावेळी रात्री सुमारे ११:४५ वा. च्या सुमारास दीपक वैजनाथ लांडगे याने घरात घुसून त्या विवाहित महिलेचा वाईट हेतुने हात धरला. याचा जाब विचारण्यासाठी ती महिला दीपक लांडगे याच्या घरी गेली असता तिला दीपक लांडगे यांच्या घरातील दोन महिलांनी धक्काबुक्की केली. पीडित महिलेच्या तक्रारी वरून दि. २४ मे  रोजी दीपक लांडगे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील दोन महिला विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ३१७/२०२६ भा न्या सं ७४, ११५(२), ३३३, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत.
इमेज
 पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची ए.पी.आय पदावर पदोन्नती परळी प्रतिनिधी : कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जबाबदारीने सेवा बजावणारे पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची नुकतीच ए.पी.आय (असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल रविवार दिनांक २४ मे रोजी परळी येथील चेमरी रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उंबरे यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, लक्ष्मण वैराळ, विनोद उंबरे, हेड कॉन्स्टेबल कोरडे, मेजर, पोलिस नाईक गवते, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, पो. कॉ. भोसले, पो. कॉ. कोकाटे, पो. कॉ. गमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ प्रदान करून त्यांचा सत्कार केला. लक्ष्मण उंबरे हे सध्या राज्याचे माजी मंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या व्ही.आय.पी. सुरक्षा पथकात पी.एस.आय म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष आणि तत्पर सेवेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व...

आंतरजिल्हा टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

इमेज
आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे जेरबंद महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई कडा | प्रतिनिधी.... आष्टी शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व दागिने धूम स्टाईलने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सख्ख्या मेहुण्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत दोन मोठ्या गुन्ह्यांची कबुली मिळाल्याने आणखी चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती.शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकास गड्या भोसले (वय २२,रा.चिखली,ता.आष्टी, जि. बीड) आणि अरुण बप्पा काळे (वय २२, रा. बोलेगाव,ता. ग...

खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र

इमेज
बीड जिल्ह्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका ; तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या! खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र बीड : बीड जिल्ह्यात १५ मे २०२६ पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेती पिके, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभेचे खा. बजरंग सोनवणे यांनी संवेदनशील भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे, नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त पथकांमार्फत युद्धपातळीवर पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. १५ मे पासून सुरू असलेल्या या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली उभी पिके, फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय, चक्रीवादळाच्या ...

चॉकलेटसाठी रस्त्यावर उतरून तमाशा...भारतीय उत्पादकांचा अपमान..

इमेज
मेलोडीला गोडी देशभक्तीची, राहुल गांधीनं लावली वाट स्वदेशीची चॉकलेटसाठी रस्त्यावर उतरून तमाशा...भारतीय उत्पादकांचा अपमान    2014 साली देशाची सुत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हाती घेतली अन् स्वदेशीचा गाजावाजा सुरू झाला. आत्मनिर्भर भारत कल्पनेचा जन्म त्यातुनच पुढे आला. करोनासारख्या भयंकर आजाराची लस देखील आत्मनिर्भर झाली. प्रत्येक भारतीयाला स्वदेशीचा स्वाभिमान असतोच पण केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ता बाहेर पडलेल्या काँग्रेस संस्कृतीला मात्र स्वदेशी कल्पना तर सोडा  भारतीय उत्पादकांचा तिळाएवढा अभिमान वाटत नाही हे दुर्दैव. मेलोडी चॉकलेटची गोडी देशात चाळीस वर्षापासुनची चाखत आलो. तोच स्वाभिमान उराशी बाळगुन इटालीत दौर्‍यावर गेलेल्या मोदीजींनी त्या देशाच्या पंतप्रधान मेलोनीला मेलोडी भेट दिली. खरं तर भारतीय संस्कृती, रूढी, परंपरेचा तो भाग देखील आहे. एका भेटीनं तेवढ्या भेटवस्तूनं खरं तर चॉकलेटची गोडी आंतरराष्ट्रीय बाजारात जावुन पोहोचली. तिथेच भारतीय नागरिकांची कॉलर टाईट झाली. मात्र केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ताबाहेर खिचपत पडलेल्या काँग्रेसवाल्यांचं पित्त खवळलं. अगदी राहुल गांधीपासू...
इमेज
  जादूटोणा व फसवणूक करणाऱ्या महिलेला बीड जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी तडीपार; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश बीड येथील मोमीनपुरा पेठ भागातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या शेख नाजिया शेख पाशा या महिलेला बीड जिल्ह्यातून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० मे रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित महिलेवर २०१४ ते २०२४ या कालावधीत जादूटोणा करणे, नागरिकांची फसवणूक करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्या क्रूर कृत्यांमुळे नागरिकांच्या मालमत्तेला व जीविताला धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार, या महिलेला दोन दिवसांच्या आत बीड जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सहा महिने दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. हद्दपारीच्या काळात ती ज्या नवीन ठिकाणी राहील, तेथी...