पोस्ट्स

जून ७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा”

इमेज
संत जगमित्रनागा अभंग गाथेच्या प्रकाशनानंतर संत जगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुटमध्ये स्वागत व सत्कार पिरंगुट, प्रतिनिधी : ऐतिहासिक संतभूमी पिरंगुट येथील १३व्या शतकातील संतश्रेष्ठ जगमित्र नागा महाराज यांच्या दुर्मिळ अभंगांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘संत जगमित्रनागा अभंग गाथा’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने संपादक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचा स्वागत व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा ‘संत जगमित्र नागा चरित्र’ ग्रंथाचे लेखक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांनी संपादित केलेल्या या गाथेमध्ये संत जगमित्रनागा महाराजांचे दुर्मिळ अभंग संकलित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अभंगांसोबत त्यांचा सोपा व सुबोध भावार्थही देण्यात आल्याने हा ग्रंथ वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, संशोधक आणि संत साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आर. आर. सूर्यवंशी, एस. आर. सूर्यवंशी, मठाधिपती श्री गिरी महाराज, मुळशी पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच चांगद...
इमेज
गावच्या राजकारणावरून दोघांनी स्मशानभूमीतच केली हाणामारी केज: गावच्या राजकारणावरून झालेल्या वादातून स्मशानभूमीतच दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली आहे. १० जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली माळी येथील रहिवासी हेमंत श्रीपती घोडके हे गावाशेजारील स्मशानभूमीजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाच्या सावलीत बसले होते. त्याच वेळी गावातील तुकाराम दादाराव गालफाडे तेथे आले. दोघांमध्ये गावच्या राजकारणावर चर्चा सुरू असताना अचानक वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. हेमंत यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, संतप्त झालेल्या तुकाराम यांनी त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तुकाराम यांनी लाकडाने हेमंत यांच्या हातावर आणि पायावर बेदम प्रहार केले. या मारहाणीत हेमंत जखमी झाले.      या घटनेमुळे शांत असलेल्या ग्रामीण भागात राजकारणाचा विळखा किती घट्ट आणि उग्र झाला आहे, याचे विदारक चित्र समोर आले आहे. हेमंत घोडके यांनी ...
इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
जितेंद्र नव्हाडे यांना मातृशोक; सौ.नंदाबाई नव्हाडे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           येथील सेवानिवृत्त शिक्षक विलासराव नव्हाडे यांच्या पत्नी सौ नंदाबाई विलासराव नव्हाडे यांचे आज दि. 12 रोजी रात्री दहा वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांच्या त्या मातोश्री होत.      सौ. नंदाबाई विलास नव्हाडे  अतिशय मनमिळावू व कुटुंब वत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 66 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नव्हाडे परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.   आज अंत्यसंस्कार      दरम्यान,नंदाबाई नव्हाडे यांच्या पार्थिवावर आज दि. 13 रोजी परळी वैजनाथ येथे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्...
इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...
इमेज
परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा खा.बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची भेट घेऊन व्यक्त केल्या तीव्र भावना परळी: तौहिद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे. येथील युवक तोहीद पठाण याची काही दिवसांपूर्वी झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरासह जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पठाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी आज पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी आम्ही पठाण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही देत खासदार सोनवणे यांनी या प्रकरणातील दोषींवर अत्यंत कठोर आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे पठाण कुटुंबियांना झालेल्य...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई....

इमेज
  परळी वैजनाथ: धर्मापुरीत गांज्याचा साठा उघड;  9.77 लाखांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ, दि. 11: पुढारी वृत्तसंस्था.....      परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 9 लाख 77 हजार 320 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय 55, रा. धर्मापुरी, ता. परळी) व वसीम बाबुलाल अत्तार (रा. धर्मापुरी, ता. परळी) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. धर्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 11 जून रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका पांढऱ्या पोत्यात ठेवलेला उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर तो 20 किलो 340 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या ...

पोलिसांकडून तपास सुरू....

इमेज
  खळबळ घटना: किराणा दुकानात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला धारूर: तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे शरद आश्रुबा धनवे (वय ४५, रा. सोन्नाखोटा) या व्यक्तीचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच एका किराणा दुकानात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेनंतर धनवे यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.       या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगत पहाटे दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून धारूर पोलीस विविध अंगांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचा संशय असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याची अचूक दिशा स्पष्ट होई...
इमेज
आईचा चारधाम दर्शनाचा संकल्प लेक करतेयं पूर्ण! ना. पंकजाताई मुंडेंनी आई आणि बहिण प्रीतमताईंसह द्वारकेत घेतले दर्शन देशातील एकमेव गो हाॅस्पीटलला दिली भेट ; वृक्षारोपणही केले मुंबई दि. ११ -- चारधाम यात्रेचे दर्शन घडवून आणण्याचा आईसाठी केलेला संकल्प राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे पूर्ण करत आहेत. आज त्यांनी आई प्रज्ञाताई व बहिण माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यासह द्वारकेत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. याठिकाणी देशातील एकमेव असलेल्या गो हॉस्पिटलला भेट दिली तसेच पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल वृक्षारोपणही केले.    यासंदर्भात एक पोस्ट करत ना. पंकजाताईंनी आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करत असल्याचे म्हटले आहे. एक दिवस मिळाला की आई आणि बहिण प्रीतमताईंसह आम्ही निघालो.आज देवभूमी द्वारका येथे श्री द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी द्वारकाधीश मंदिर ट्रस्ट आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच ना. पंकजाताईंनी आईला घेऊन बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला जाऊन दर्शन ...

मग्रूर बॅंक व्यावस्थापकावर कार्यवाहीची मागणी ...

इमेज
  बॅंक व्यावस्थापक विरोधात १६ जून रोजी अंदोलन  सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखे समोर बेमुदत ठिय्या अंदोलन  सिरसाळा  :  पत्रकार,शेतकरी,नागरिक यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेच्या व्यावस्थापक संदिप रेड्डी वर तात्काळ कार्यवाही करावी , या ठिकाणाहून बदली करावी या मागणी साठी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्र ग्रामीण बॅंके समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. या बाबत काल दिनांक ११ जून रोजी बॅंक प्रशासनास निवेदन दिले आहे.  या बाबत सविस्तर वृत्त असे कि, केसीसी खातेदार किती आहेत ? आपल्या शाखेतील कर्जमाफीत किती शेतकरी पात्र ठरत आहेत अशी विचारणा सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा व्यवस्थापकांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारली असता व्यावस्थापकाने उद्धट वर्तन करत अंत्यत मग्रूरीने थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे, दिनांक १० जून रोजी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दोन शेतकरी समावेत परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत गेले होते. या ठिकाणी उपस...
इमेज
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेनी केली होळी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने परळी वै. 12 प्रतिनिधी  शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड जिल्हा समितीच्या वतीने गुरुवार ता 11रोजी सकाळी अकरा वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात येऊन राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी निर्णयाची होळी करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, देवस्थान व गायरान जमिनी, खते-बियाणे उपलब्धता तसेच शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ता 11 रोजी सकाळी 11 वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीसमोर शेतकरी एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणा विरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपाची कर्जमाफी लागू करावी, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नसल्याने खरीप 2025 हंगामासाठी म...
इमेज
  कर्णबधिर विद्यार्थिनी शाश्वती कांबळेची यशोगाथा : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या बळावर एसएससी बोर्डात प्रथम क्रमांक परभणी | प्रतिनिधी दिव्यांगत्व हे यशाच्या मार्गातील अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे स्व. रामराव कान्हेकर निवासी मूकबधिर विद्यालय, परभणी येथील विद्यार्थिनी शाश्वती माधव कांबळे (बिट्टू) हिने आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखविले आहे. कर्णबधिर दिव्यांगत्वावर मात करत शाश्वतीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एसएससी बोर्डामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाश्वतीच्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. तिची जिद्द, कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रसंगी तिचे कौतुक करताना मान्यवरांनी सांगितले की, दिव्यांगत्व हे यशाच्या आड येत नाही. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण घेऊन आणि ज्ञानाची कसोटी पार करत उल्लेखनीय यश मिळविता येते, याचे जिवंत उदा...
इमेज
पॅरा स्विमर आभा मुंडेची पाच सुवर्णांची विजयी हॅट्रिक  सलग तिसऱ्या वर्षी पॅरा स्विमर आभा गणेश मुंडेची सुवर्ण झेप; 5 सुवर्णपदके आणि 2 राष्ट्रीय विक्रमांची नोंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळी तालुक्यातील डाबी गावची सुवर्णकन्या तथा उदयोन्मुख पॅरा जलतरणपटू आभा गणेश मुंडे हिने 26 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षी आपल्या सुवर्ण वर्चस्वाची मोहोर उमटवली आहे. बेंगळुरू येथील Zee Swim Academy येथे 8 ते 10 जून 2026 दरम्यान झालेल्या जुनियर व सब ज्युनिअर राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभाने सलग तिसऱ्या वर्षी तब्बल 5 सुवर्णपदके जिंकत 2 नवीन राष्ट्रीय विक्रमांची (National Records) नोंद आपल्या नावावर केली. देशभरातील आठरा राज्यांमधील अव्वल पॅरा जलतरणपटूंच्या उपस्थितीत झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आभाने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्ण यश संपादन केले. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदकांची कमाई ( हॅट्रिक ) करून तिने ...
इमेज
आईच्या अस्थी विसर्जनासाठी प्राध्यापक पुत्राचा पायी तीर्थयात्रेचा संकल्प  43 अंश तापमानात आवलगाव ते पंढरपूर पायी प्रवास; मातृभक्तीचा अनोखा आदर्श परळी वैजनाथ, दि. १० :  प्रतिनिधी        आईच्या अस्थींचे विसर्जन विविध पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये करण्यासाठी एका प्राध्यापकाने कडक उन्हात पायी तीर्थयात्रेचा संकल्प केला आहे.या उपक्रमाची परिसरात चर्चा होत असून मातृभक्ती, श्रद्धा आणि दृढनिश्चयाचे हे उदाहरण मानले जात आहे. परळी वैजनाथ पासून जवळच असलेल्या आवलगाव ता. सोनपेठ येथील रहिवासी या प्राध्यापक पुत्राने आपल्या आईच्या अस्थी घेऊन आपली पायी वारी सुरू केली आहे.       परळी वैजनाथ पासून जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील रहिवासी रुक्मिणीबाई नारायणराव धोंडगे यांचे १४ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर त्यांचे पुत्र तथा जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे यांनी आईच्या अस्थी पंढरपूर, आळंदी, तुळापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयागराज आणि गया येथे विसर्जित करण्या...

ॲड. दत्तात्रय आंधळे संपादित जगमित्रनागा गाथेतील अभंग व आरती.

इमेज
  इंदौर येथे संत जगमित्रनागा गाथेतील अभंग व आरतीचे सुमधुर गायन इंदोर (प्रतिनिधी) – मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश यांच्या वतीने आयोजित ‘समरसतेचे संत’ या विशेष कार्यक्रमात संत साहित्याचा समृद्ध वारसा उलगडून दाखविण्यात आला. यावेळी संत वाङ्मयाचे संशोधक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांनी संपादित केलेल्या अत्यंत दुर्मिळ संत श्री जगमित्रनागा अभंगगाथेतील निवडक अभंगांचे सादरीकरण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक श्री निनाद आजगावकर यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. नेत्रा रावणकर लिखित ‘भारतीय दर्शनशास्त्र’, ‘पाश्चात्य दर्शनशास्त्र’ आणि ‘संत चोखामेळा’ या पुस्तकांचे प्रकाशन संत वाङ्मय संशोधक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास आषाढी-कार्तिकी वारी महामंडळाचे संचालक श्री संतोषजी गोडबोले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच मध्यप्रदेश मराठा समाजाच्या अध्यक्षा सौ. अर्चना चितळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात संत जगमित्रनागा यांच्या अभंगांचे गायन श्री निनाद आजगावकर, सौ. नीरजा आजगावकर, कु. शाश्वती आजगावकर सुमधुर स्वरांत सादर केले....

तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

इमेज
  परळीत महिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास घरातून घेऊन जाऊन अमानुष मारहाण परळी वैजनाथ: प्रतिनिधी...        परळी येथील  महिला महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यास त्याच्या राहत्या घरातून गाडीवर बसवून घेऊन जाऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल दि. ०९ जून २०२६ रोजी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.     पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी अनिल बाबुराव पत्की हे परळी येथील महिला महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.आरोपी वैजनाथ यादव (रा. परळी) याच्यासोबत त्यांचे मागील काही वर्षांपासून पैशांचे व्यवहार होते. दिनांक ०९ जून रोजी सकाळी १० वाजता आरोपी वैजनाथ यादव फिर्यादीच्या घरी आला. व्यवहाराच्या बहाण्याने त्याने फिर्यादीला आपल्या दुचाकीवर बसवून कॉलेज रोड, काळ रात्री मंदिर आणि धारावती परिसरात नेले. नदीच्या पलीकडे एका निर्जन झाडीमध्ये त्याने गाडी थांबवली. त्या ठिकाणी आरोपीचे  दोन अनोळखी साथीदार मोटारसाय...
इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा नवा विक्रम ; ना. पंकजा मुंडे मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक मुंबई दि. १० -- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी कारकिर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती केली.  नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात जनादेशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून  पंतप्रधान म्हणून सर्वाधिक ४ हजार ३९९ दिवसांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे.​त्यांचा हा कार्यकाळ असाच उत्तरोत्तर वाढत जावो आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वात देशाच्या प्रगतीचा हा यशस्वी प्रवास अविरत सुरू राहो, अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुंबईची ग्रामदेवता, आई जगत्जननी श्री मुंबादेवीचे दर्शन घेत प्रार्थना केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ••••
इमेज
  पुरूषोत्तम पुरीतील बोट दुर्घटना ; ना. पंकजा मुंडेंनी महिला भाविकांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केली हळहळ बीड दि. १० -- माजलगांव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय वेदनादायी आहे, या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली.    पुरूषोत्तम पुरी येथे सध्या अधिकमासा निमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गोदावरी नदीकाठी हे मंदिर असल्याने काही भाविक बोटीतून दर्शनाला निघाले होते पण अचानक बोट उलटली आणि यात सिंदखेडराजा तालुक्यातील  रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. या अपघातात इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.   ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे, ईश्वर दिवंगत आत्म्यांना सद्गगती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान ...

बीड जिल्ह्यात पुन्हा एक खून!

इमेज
  विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; पतीसह सासरा व सासूवर गुन्हा दाखल बीड: हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   कचरु किसन घुले यांनी याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पावलाने घरात यश आले नाही, असे म्हणून पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली जात होती.   ८ जून २०२६ रोजी संध्या हिचा मृतदेह कुटेवाड...

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

इमेज
  मोठी अपडेट: परळीतील तौहीदखान पठाण खून प्रकरण : पोलिसांकडून तपासातील वास्तविकता जाहीर जातीय किंवा सामुदायिक कटाचा रंग देऊ नये- बीड पोलिसांचे आवाहन बीड: प्रतिनिधी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अफजलखान उर्फ तौहीद खेरातीखान पठाण याच्या खून प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून अत्यंत बारीक पुराव्यांसह सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड व गौरव दीपक व्यास यांना आधीच अटक केली आहे. मद्यप्राशन आणि आर्थिक वाद हेच कारण पोलिसांनी उपलब्ध भौतिक व तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाला आणि त्यातूनच ही घटना घडली हेच आत्तापर्यंतच्या तपासादरम्यान समोर आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक संदेश, व्हिडिओ क्लिप्स आणि दावे प्रसारित केले जात आहेत. काही घटकांकडून या घटनेला जातीय, सामुदायिक किंवा संघटित गुन्हेगारीचे स्वरूप द...
इमेज
  गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या ! केज:- केज येथील सहशिक्षक सूर्यकांत बालासाहेब वाघमारे वय (४१वर्ष) रा. लव्हुरी ता. केज ह. मु. शाहू नगर केज यांनी कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या पेट्रोल पंपाचे बाजूचे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.        आत्मत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या केलेले शिक्षक सूर्यकांत वाघमारे यांची पत्नी सरकारी सेवेत असून त्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. दि. ९ जून रोजी रात्री ९:०० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले आहे.

अभिष्टचिंतन लेख>>>>>>प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे

इमेज
आदर्श शिक्षक, समाजसेवक आणि समुपदेशक : जी. एस. सोंदळे  "ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अमृतमहोत्सवी प्रवास" काळाच्या प्रवाहात अनेक व्यक्ती भेटतात; परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचा सहवास, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य अनेकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून जाते. अशा व्यक्तिमत्त्वांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा इतिहास नसतो, तर तो समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. आदर्श शिक्षक, समाजसेवक, समुपदेशक आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून लौकिक प्राप्त केलेले आदरणीय जी. एस. सोंदळे सर हे अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.त्यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, विचारांचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करणे म्हणजे एका समृद्ध जीवनप्रवासाला समजून घेण्याची पर्वणीच होय! शिक्षक नव्हे, तर जीवनशिक्षक:- शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची एक सृजनशील साधना आहे. सोंदळे सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले; परंतु त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांन...
इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...
इमेज
  राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष ‘रक्षा अलंकरण’ सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामबाला जंजाळ आणि आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. 6 जुलै 2024 रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीसह कार्यरत होते. मोहिमेदरम्य...

मुंबई महानगर प्रदेशाच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती!

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या ₹17,036 कोटी; तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 A आणि मार्ग 2 च्या ₹5575 कोटी, अशा एकूण ₹22,611 कोटींच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा 6 पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्...
इमेज
  जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना  बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या - अनिल बोर्डे   गेवराई( प्रतिनिधी) खरीप हंगाम सन 2026- 27 सोयाबीन वितरण या घटकासाठी निवड झाली आहे. सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण कृषी बियाणा चा लाभ घ्यावा विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे संदेश शेतकरी ग्राहकांना प्राप्त झाले आहेत व सदरील आज पासून   पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा असे संदेश शेतकरी ग्राहकांना प्राप्त झाले आहेत परंतु प्रत्यक्षात कृषी विभागाकडे किंवा संबंधित एजन्सीकडे बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.  नियुक्त कृषी विक्रेत्याकडे बियाणे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे हे योग्य नाही तरी कृषी विभागाने शेतकरी ग्राहकांना तात्काळ शासनाचे  बियाणे उपलब्ध करून द्यावेत. शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केली आहे. यासाठी संदेश, सातबारा, आठ अ, आ...
इमेज
मेंढपाळांचे स्थलांतर रोखण्यासाठी अर्ध बंदिस्त मेंढीपालन योजनेचा प्रकल्प अहवाल सादर करा मंत्रालयातील आढावा बैठकीत ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश कृषी मंत्री दत्ता भरणे, आ. अडसड यांची बैठकीला उपस्थिती मुंबई, दि. 9 : राज्यातील मेंढपाळांची भटकंती थांबविण्यासाठी अशा मेंढपाळांची माहिती जमा करून प्रायोगिक तत्वावर अर्धबंदिस्त पद्धतीने मेंढीपालन प्रकल्प योजना राबविण्यासाठी अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिले.   राज्यातील मेंढपाळांच्या भटकंती व स्थलांतराच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे, आमदार प्रताप अडसड, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, पुण्यश्लोक अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शीतलकुमार मुकणे,  अमरावती मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे आदि उपस्थित होते. महाराष्ट्रातील बहुतांश मेंढपाळ मेंढीपालन व्यवसायासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्याम...

साहित्यिक दगडूदादा लोमटे यांची सदिच्छा भेट

इमेज
  प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे काळाची गरज- ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे परळीतील डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास  सदिच्छा भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-                     आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे स्रोत वाढले असले, तरी वाचनातून मिळणारे ज्ञान, चिंतन आणि वैचारिक समृद्धी याला कोणताही पर्याय नाही,  समाजात ज्ञान, संस्कार आणि वैचारिक समृद्धी वाढविण्यासाठी प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू विचारवंत तथा अंबानगरीचे भूमिपुत्र दगडूदादा लोमटे यांनी परळीतील डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे यांची सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी व्यक्त केले.       परळी वैजनाथ शहरातील  डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाकडे सध्या ४१,२८८ हजारांहून अधिक पुस्तकांची समृद्ध ग्रंथसंपदा असणाऱ्या नगर परिषदेच्या डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू विचारवंत तथा अंबानगरीचे भू...