पोस्ट्स

मे ३१, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...
इमेज
"तू मला का बोलत नाहीस" म्हणत तरुणीवर चाकूने सपासप वार करून हल्ला; एकाविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी शहरातील पंचशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या  एका २३ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा(निजाम) ता.परंडा जि.धाराशिव येथील मुळ रहिवाशी असणारी पिडित तरुणी परळी वैजनाथ येथील पंचशील नगर परिसरात एका रुमवर राहत होती. शुक्रवारी (दि. ५ जून) रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता.परळी वैजनाथ) हा  पिडितेच्या घरी गेला. चारित्र्याच्या संशयावरुन यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत तू मला का बोलत नाहीस असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने चाकूने तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार केल...

खेत बचाव अभियान" आणि "किसान गोष्टी" उपक्रम....

इमेज
हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन परळी वैजनाथ, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने "खेत बचाव अभियान" आणि "किसान गोष्टी" उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन प्रमुख उपस्थित होते. हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक उपाययोजना आणि शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांनी केले होते. कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथील कृषि विस्तार विषय विशेषज्ञ सुहास पंके यांनी प्रास्ताविक करत एल-निनोच्या संभाव्...
इमेज
पोलीस  दत्तात्रय बळवंत  लाच घेताना पकडला  नेकनुर, जिल्ह्यातील लाचखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी नेकनुर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोर आरोपीला घेऊन लागलीच एसीबीचे कर्मचारी नेकनूरमधून बाहेर पडले. बीडमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनुर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्...

महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

इमेज
  देवस्थान इनाम जमीन कायद्याचा मसुदा स्थगित; हिवाळी अधिवेशनात सुधारित विधेयक आणणार   महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६ जून रोजी देवस्थान इनाम जमीन निर्मूलन कायद्याचा प्रारूप मसुदा तूर्तास स्थगित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील सुमारे ५.५ लाख हेक्टर देवस्थान जमिनींवरील अतिक्रमणे रोखणे, प्रभावशाली व्यक्तींचा ताबा हटवणे आणि देवस्थानांचे हक्क पुन्हा प्रस्थापित करणे या उद्देशाने महसूल विभागाने स्वतंत्र कायदा आणण्याची तयारी सुरू केली होती. या कायद्याचा प्रारूप मसुदा ६ मे रोजी सार्वजनिक करून त्यावर ५ जूनपर्यंत नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र, या मसुद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने तसेच देवस्थाने आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने सरकारने हा मसुदा स्थगित करून प्रत्येक आक्षेपावर सखोल सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या पुनर्रचनेसाठी आणि प्राप्त आक्षेपांचे निवारण करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वि...

जिल्हाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून उकळली रक्कम

इमेज
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून उकळली रक्कम; गुन्हा दाखल होताच तोतया महिला अधिकारी फरार अंबाजोगाई, दि. ६ : जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक (पीए) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाई येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी काजल देविदास भट्ट (रा. मारवाड गल्ली, नानज, ता. जामखेड) हिच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार संतोष शिंदे (वय २४, रा. अमृतेश्वरनगर, अंबाजोगाई) हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आरोपी काजल भट्ट ही फिर्यादीच्या मामीच्या घरी भाड्याने राहत होती. तिने स्वतःला अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन केला होता. काही दिवसांपूर्वी तिने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक पदाच्या तीन जागा रिक्त असल्याचे सांगत ओमकार शिंदे यांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वरिष्...

उड्डाण पुलाजवळ पानमसाला तस्करी...

इमेज
परळीत बनावट पानमसाला वाहतूक उघड; 6.24 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण अटकेत परळी वैजनाथ, दि. 3 जून : परळी शहरातील उड्डाण पुलाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून प्रतिबंधित व बनावट पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत पानमसाल्याचा साठा, वाहन व इतर साहित्य असा एकूण 6 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रामा टायरजवळ उड्डाण पुलाखाली रोडवर संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी सचित आनंदराव धर्माधिकारी (वय 42, रा. लातूर) याच्या ताब्यातून प्रतिबंधित पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विविध ब्रँडच्या पानमसाल्याच्या गोण्या, पिशव्या तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार (MH-12 JU 7952) यांचा समावेश आहे. तपासादरम्यान पानमसाल्याचा साठा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांच्या श्रेणीत येत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पानमसाल्याचा साठा, वाहन आणि इतर साहित्य असा 6.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला....

कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन

इमेज
परळीतील मयत तौहीद खान यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी शहरातील रहिवासी, आमचा तरुण भाऊ तौहीद खान  याच्या दुर्दैवी व निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून याविषयी आपण सातत्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो; तोहिदच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल व खान कुटुंबीयांना न्याय मिळेल यादृष्टीने पुढील तपास व चार्जशीट दाखल करण्याबाबत पुढेही मी पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे म्हटले आहे.  वैद्यकीय कारणास्तव आपण मागील चार-पाच दिवस बाहेर असल्याने याबाबत व्यक्त होत आले नाही असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले असून, परळीत हिंदू-मुस्लीम सर्व समाज बांधव एकोप्याने मागील अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. आमचा हा एकोपा बाधित होऊ शकत नाही त्यामुळे कृपया कोणीही या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.  दरम्यान मयत तौह...
इमेज
पोलिसांची मोठी कारवाई; पावणेआठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने परळी वेस परिसरात ३ जून २०२६ रोजी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल ३ लाख ४० हजार २० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ४ लाख ५० हजार रुपयांचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९० हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई येथील मोरेवाडी परिसरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारा २५ वर्षीय आरोपी शशिकांत शिवाजी बुलबुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अंबाजोगाई शहर पोलिसांना परळी वेस परिसरातून प्रतिबंधित मालाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला. संशयास्पद वाटणारे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-४४-बी-२५२९ थांबवून त्याची झडती घेतली असता, त्यात विमल पान मसाला, विडी-१ तंबाखू, प्रीमियम गोवा १००० मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम ...

महावितरण जागे होणार की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार?

इमेज
  महावितरणचा बेशिस्त कारभार; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच! रात्रभर वीज गायब; उकाडा, डास आणि अंधारात नागरिकांचा अक्षरशः छळ परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचा भोंगळ, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वीज गुल झाल्यानंतर संपूर्ण रात्र नागरिकांनी उकाडा, डासांचा त्रास आणि असह्य घुसमटीत काढली. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला डासांचा वाढता त्रास यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींची अक्षरशः परवड झाली. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि इतर आवश्यक साधने बंद पडली. रात्रभर झोप न लागल्याने नागरिक हैराण झाले. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांचे फोन उचलले गेले नाहीत. नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये...

चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

इमेज
  महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड! चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आधीच उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांवर उकाड्यात रात्र काढण्याची वेळ आली. विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याची खरी सुरुवातही झालेली नाही. केवळ किरकोळ पाऊस पडताच वीजपुरवठा खंडित होत असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती बिकट होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे महावितरणकडून दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात चार-पाच थेंब पावसातच वीज गायब होत असल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कागदोपत्री तयारी आणि प्रत्यक्षातील निष्क्रियता यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. वीज खंडित झाल्यामुळे लहान मु...

नंदागौळ गावावर शोककळा..... परळी परिसरात हळहळ

इमेज
पुण्यात घरगुती गॅसचा भीषण स्फोट; नंदागौळ येथील तिघांचा मृत्यू, बालिकेसह दोघे जखमी नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.       पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे तर गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्राप्त झालेली माहिती अशी की, नंदागौळ येथील रहिवासी व सध्या पुणे येथे खराडी परिसरात वास्तव्यास असलेले विष्णू मुंजाजी गित्ते यांच्या पुण्यातील घरी आज ता.5 जून रोजी सकाळी 9.30 वाजण्याचे सुमारास घरातील स्वयंपाकांच्या गॅसची अचानक गळती होऊन मोठा स्फोट झाला. स्फोटात पांडुरंग विष्णू गित्ते (वय-35 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू मुंजाजी गित्ते (वय-62 वर्ष), त्यांची पत्...
इमेज
परळी सकल मातंग समाजाच्या वतीने अ.ब.क.ड आरक्षण उपवर्गीकरणासाठी तहसिल कार्यलय समोर धरणे आंदोलन व निदर्शने  परळी/ प्रतिनिधी  सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ ब क ड उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी परळी तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक ३ जून २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.   दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दविंदर सिंग पंजाब सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचच्या पीठाने ६:१ असा निर्णय देऊन अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून. हरियाणा, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक, पंजाब , तेलंगणा सह पाच राज्यांनी उप वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्रात 14 ऑक्टोबर 2025 रोजी यासंदर्भात न्यायमूर्ती बद्दर यांची समिती नेमली असून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप उपवर्गीकरणाचा निर्णय होत नसल्याने परळी तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात...

शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी वैद्यनाथा चरणी केली प्रार्थना

इमेज
  कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या  सुख-समृद्धीसाठी वैद्यनाथा चरणी केली प्रार्थना परळी वैजनाथ | प्रतिनिधी... अधिकमासाच्या पवित्र पावन पर्वाचे औचित्य साधत कळंब नगरीच्या नगराध्यक्षा तथा शिवसेना (शिंदे गट) नेत्या सौ. सुनंदाताई शिवाजीआप्पा कापसे यांनी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे भेट देऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा-अर्चना करून राज्यातील जनतेच्या आरोग्य, सुख-समृद्धी तसेच शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. सौ. सुनंदाताई कापसे यांनी कळंब शहरातील सुमारे ५१ महिला भक्तांसमवेत वैद्यनाथ धाम यात्रा पूर्ण केली.    याबाबत अधिक माहिती असते, सध्याला पुरुषोत्तम मासाचे पावन सर्व सुरू आहे. भारतीय धार्मिक पुरुषोत्तम मासास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे औचित्य साधत अधिकमासाच्या धार्मिक वातावरणात कळंबच्या प्रथम नागरिक सौ. सुनंदा शिवाजीआप्पा कापसे यांनी महिला माता-भगिनींसह भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्...
इमेज
  डॉ. संतोष मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश; एसटीच्या 'शिवाई' आणि 'स्लीपर' बसेसमध्ये दिव्यांगांसाठी जागा आरक्षित! परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिव्यांग प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या अत्याधुनिक 'शिवाई' आणि 'शयनयान' (स्लीपर) बसेसमध्ये आता दिव्यांग प्रवाशांसाठी जागा (सीट्स) राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या 'दिव्यांगांच्या दारी' अभियानाचे उपाध्यक्ष मा. डॉ. श्री. संतोष मुंडे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या संदर्भात महामंडळाच्या वाहतूक खात्याने अधिकृत पत्रक जारी केले आहे. बसेसमधील आरक्षित आसन क्रमांक खालीलप्रमाणे : * शिवाई बसेस: आसन क्रमांक ३, ४, ५, आणि ६ दिव्यांगांसाठी राखीव. * विना वातानुकूलित शयनयान (Non-AC Sleeper): आसन क्रमांक ७ राखीव. * विना वातानुकूलित शयनयान/आसनी (Sleeper/Seating) बसेस: आसन क्रमांक ६ राखीव. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांचा एसटी बसमधील प्रवास अधिक सुकर, सुटसुटीत आणि आ...

खळबळजनक घटना......गंभीर प्रकार

इमेज
  परळी तालुक्यात आर्थिक व्यवहारातून खून; मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप परळी वैजनाथ, दि. ३ जून — परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या खुनाप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोजखान खैरातीखान  पठाण (रा. सरदारनगर, परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपी  विरुद्ध भारतीय न्याय संहिता  कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव अफजलखान उर्फ तोहिद केरातीखान पठाण (वय 36, रा. सरदारनगर, परळी) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार,  दोन आरोपींनी संगनमत करून आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अफजलखान याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह परळीजवळील लेंडेवाडी शिवारातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 31 म...
इमेज
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पुण्यतिथी निमित्त स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन  परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)        लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, संचालिका छायाताई देशमुख, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय देशमुख म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मराठवाड्याच्या विकासात मोठे योगदान आहे. ते संघर्षनेते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण फुटके य...

३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...

इमेज
लोकनेते मुंडे साहेबांचा उद्या स्मृतीदिन ; भजन, प्रसाद, सामाजिक उपक्रमांच आयोजन ना. पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा उद्या स्मृतीदिन असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे  हया परिवारासह उद्या याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.     सध्याची परिस्थिती आणि देशावर आलेले संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यंदा मुंडे साहेबांची पुण्यतिथी आपापल्या गावात व घरीच करण्याचे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे,  त्यामुळे गोपीनाथ गडावर यंदा भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी यादिवशी भजन, प्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे उद्या सकाळी १० वा. गोपीनाथ गडावर पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या मुंडे साहेबांना आवडणा-या पदार्थाचा नेवैद्य समाधीसमोर अर्पण करणार आहोत. यावेळी आप...

३ जून..... गोपीनाथगडावर होणार नतमस्तक...

इमेज
  पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांचा २ ते ४ जून दरम्यान बीड जिल्हा दौरा परळी वैजनाथ: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा २ जून ते ४ जून २०२६ या कालावधीत बीड जिल्ह्याचा अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसीय दौऱ्यात विविध शासकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार, २ जून २०२६ रोजी दुपारी ०२.०० वा.: रामटेक निवासस्थान (मुंबई) येथून वाहनाने समृद्धी महामार्ग मार्गे परळी वैजनाथ, जि. बीडकडे प्रस्थान. , रात्री ११.०० वा.: परळी येथील 'यश:श्री' निवासस्थानी आगमन व राखीव. बुधवार, ३ जून २०२६ रोजी सकाळी ०९.३० वा.: 'यश:श्री' निवासस्थान येथून गोपीनाथगड (परळी) कडे प्रस्थान., सकाळी १०.०० वा.: लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिना निमित्त समाधीस्थळाचे दर्शन व अभिवादन., दुपारी ०१.०० वा.: समाधीस्थळावरून वाहनाने 'यश:श्री' निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी ०१.१५ वा.: निवासस्थानी आगमन व वेळ राखीव., गुरुवार, ४ जून २०२६...

अज्ञात चार चाकी वाला फरार ....

इमेज
बायपासवर भीषण अपघात; वृद्ध गंभीर जखमी गेवराई, प्रतिनिधी... गेवराई बायपासवर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाले. भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अब्बास युसूफ पठाण (वय ६७, रा. राजापूर, ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी गेवराई येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रेफर केले असल्याची माहित आहे

विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

इमेज
  शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ! विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ला अधिकृत मंजुरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मात्र, यामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. लाडकी बहीण योजना आणि आता ही कर्जमाफी यामुळे आगामी काळात सरकारला मोठी आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कर्जमाफीची अधिकृत घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर...
इमेज
  परळीत अतिक्रमण न हटवल्यास नगर परिषदेसमोर साखळी उपोषण; प्रशासनाला निवेदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी रस्ता आणि गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या भागातील रस्ते व नाल्यांच्या कडेला झालेले अवैध अतिक्रमण प्रशासनाने तत्काळ हटवावे, अन्यथा नगर परिषदेसमोर गांधीगिरी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी यांनी दिला आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक रीतसर निवेदन आज नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.शहरातील या प्रमुख रस्ते आणि मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी दरम्यानच्या नाली व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरली आहे.तसेच गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या अत्यंत वर्दळीच्या परिसरातील नाला व रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आ...
इमेज
  धनंजय देशमुख व खिंडकर यांच्यातील कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या; बीड पोलिसांचा तपास पूर्ण, होणार कायदेशीर कारवाई ​बीड: पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा सर्रास गैरवापर करणाऱ्यांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   ​या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबु...

अहिल्यादेवींचे संस्कार अन् आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी

इमेज
ना. पंकजाताई मुंडे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन मुंबई दि. ३१ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज रामटेक निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. माझ्या राजकीय जीवनात अहिल्याबाईंचे योगदान महत्वाचे असून त्यांचे संस्कार व आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.     पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज रामटेक निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या मूर्तीस पुष्प वाहून त्यांना अभिवादन केले. अभिवादनाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ••••

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

इमेज
किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये  मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.  कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी: • शे...
इमेज
अंगरक्षकाचे पिस्टल काढून जीवे मारण्याचा प्रयत्न; दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल केज: मस्साजोग येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या शासकीय अंगरक्षकाचे अधिकृत पिस्टल काढून एका व्यक्तीच्या डोक्याला लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणात एका साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच आता थेट पीडित कुटुंबातील मुख्य सदस्यावरच गंभीर गुन्हा नोंदवल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी धनंजय देशमुख यांनी अचानक त्यांच्या शासकीय अंगरक्षकाची पिस्टल काढून घेतली आणि ती थ...