नुकसान भरपाईची मागणी ...

इमेज
  महावितरणचा हलगर्जीपणा भोवला; र्लोंबणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श; चालता ट्रक पेटला ; पशुखाद्य जळून खाक परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा:- तालुक्यातील सेलू येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबणाऱ्या  विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, पशुपालक शेतकरी विलास राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.            मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास राठोड हे आपल्या ट्रकमधून जनावरांसाठी कडबा घेऊन जात होते. सेलू परिसरातून जात असताना रस्त्यावरील महावितरणच्या विद्युत तारा खाली लोमकळत होत्या. या तारांचा स्पर्श ट्रकला झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या परळी परिसरात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उष्णतेमुळे ही आग वेगाने पसरली. सेलू येथील युवक नेते  बाळू फड प्रसंगावधान राखून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला.औष्णिक क...

 गणेशपार डीपीच्या देखभालीकडे महावितरण चे दुर्लक्ष; परळीत 'आम आदमी पार्टी'चा आंदोलनाचा इशारा



परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील गणेशपार भागातील विद्युत डीपीच्या देखभालीसाठी वारंवार विनंती करूनही महावितरण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत गणेशपार डीपीचे मेंटेनन्स न झाल्यास व्यापारी व नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महावितरण कार्यालयाला लेखी अर्ज देऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. थकीत वीजबिल असल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणला ग्राहकांच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे. "वारंवार वीज गेल्यामुळे होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची भरपाई महावितरण देणार का?" असा सवाल विजय जोशी यांनी उपस्थित केला आहे. जर तातडीने गणेशपार डीपीचे मेंटेनन्स पूर्ण झाले नाही, तर गणेशपार भागातील सर्व व्यापारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागाने महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....