इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

नुकसान भरपाईची मागणी ...

 महावितरणचा हलगर्जीपणा भोवला; र्लोंबणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श; चालता ट्रक पेटला ; पशुखाद्य जळून खाक





परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा:- तालुक्यातील सेलू येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबणाऱ्या  विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, पशुपालक शेतकरी विलास राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

          मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास राठोड हे आपल्या ट्रकमधून जनावरांसाठी कडबा घेऊन जात होते. सेलू परिसरातून जात असताना रस्त्यावरील महावितरणच्या विद्युत तारा खाली लोमकळत होत्या. या तारांचा स्पर्श ट्रकला झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या परळी परिसरात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उष्णतेमुळे ही आग वेगाने पसरली. सेलू येथील युवक नेते  बाळू फड प्रसंगावधान राखून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला.औष्णिक केंद्राचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, ज्यामुळे ट्रकचे पुढील नुकसान आणि इतर संभाव्य धोका टळला.

 नुकसान भरपाईची मागणी 

    दरम्यान,या आगीत वर्षभराचा साठवलेला जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने विलास राठोड यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या