भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे

इमेज
  कै.शिवाजीराव खाडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त दोन दिवस कांदेवाडी येथे होणार हरिनामाचा गजर *श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११ होणार किर्तन *भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ होणार किर्तन* *भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे* धारूर (प्रतिनिधी) :-  कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११  व भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा  धनंज...

 नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना : सावत्र पित्याचा १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार 



केज :- सावत्र पित्याने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. 

केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईने दोन मुली झाल्या नंतर  पती सोबत जमत नसल्या वरून नऊ वर्षां पूर्वी वेगळे झाली. त्या नंतर आठ वर्षा पूर्वी आरोपी सोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पती पासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई व आईने केलेल्या दुसऱ्या पती सोबत एकत्र राहतात. तिची आई ही ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता माहेरी गेली. तर पीडित मुलगी ही एकटीच घरी होती. दुपारी १२.३० सावत्र पित्याने घरी येऊन पीडित मुलीला आई कुठे गेली? अशी विचारणा केली. तिने गावाकडे गेलेल्या आईला फोन करून कधी येणार आहेस. असे विचारले. मात्र आईने वेळ लागेल असे सांगितले. हीच संधी साधून सावत्र पित्याने साडेतीन वर्षाच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसविले. पीडित मुलीला कॉटवर बसवून तिच्या सोबत लज्जास्पद चाळे करू लागल्याने मुलीने विरोध केला. आईला सांगेन असे म्हणाली, तरी आईला सांगायचे नसते. आमच्या भांडणे होतील. असे म्हणत या सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. आई घरी आल्या नंतर मुलगी रडत बसलेली पाहून विचारणा केली. ती घाबरलेली काही ही सांगत नव्हती. आईने परत परत विचारणा करीत विश्वासात घेऊन विचारणा केल्या नंतर तिने तिच्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली. १२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून सावत्र पित्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९८/२०२६ भा. न्या. सं. ६४(३)(एफ),६५(१) आणि पोक्सोचे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....