इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंकजा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन नाव उज्ज्वल करावे -नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'पंकजा फाउंडेशन'च्या वतीने गरजूवंत विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले.           मंगळवार, १४ एप्रिल रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हा बाबासाहेबांचा विचार कृतीत आणण्यासाठी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, रिपाई नेते सचिन कागदे, नगरसेवक वैजनाथ सोळंके, केशव नागरगोजे, सोपान ताटे, अश्विन मोगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ...

भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे

 कै.शिवाजीराव खाडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त दोन दिवस कांदेवाडी येथे होणार हरिनामाचा गजर




*श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११ होणार किर्तन


*भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ होणार किर्तन*


*भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे*


धारूर (प्रतिनिधी) :- 

कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११  व भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

       परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा  धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.३ शके १९४८ सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवार, १९ एप्रिल २०२६ रात्रौ ९ ते ११ श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे हरिकिर्तन होईल. सोमवार, २० एप्रिल २०२६ सकाळी ११ ते १ भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सुश्राव्य हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भोजन वेळ  सोमवार, २० एप्रिल २०२६ दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत आहे.

  कांदेवाडी येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भुतपुर्व शाखाधिकारी शिवाजीराव खाडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळी, आंबेजोगाई, बीड,घाटनांदुर व धर्मापुरी शाखेच्या व्यवस्थापक पदी त्यांनी काम केले होते . सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. रामायणाचे ते गाढे अभ्यासक होते. कांदेवाडी येथील पहिले पदवीधर म्हणून त्यांची विशेष ओळख होती. धारूरसह परळी व परिसरात जुने ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणुन प्रसिध्द होते. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते. तसेच धार्मिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रासह अन्य कार्यात अग्रेसर म्हणून धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तीमत्व म्हणून कै.शिवाजीराव खाडे यांचे ओळख होती.   

      कांदेवाडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक,सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच परिसरातील भाविक भक्तांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी कांदेवाडी ता.धारूर (दिंद्रड येथून दक्षिणेस 6 किमी अंतरावर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदिप शिवाजीराव खाडे (अध्यक्ष, कै.रामभाऊ आण्णा खाडे सेवाभावी संस्था, लातूर, अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कुमठा, तथा सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ), विलास शिवाजीराव खाडे, बालासाहेब शिवाजीराव खाडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....