इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे,अशी मागणी

परळी ते खडका (नैकोटा मार्ग) रस्त्याची झाली चाळण; नागरिक व भाविकांचे  हाल 

परळी वैजनाथ: प्रतिनिधी.....

परळी ते खडका (मार्गे नैकोटवाडी (दत्तवाडी) या 25 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जागोजागी मोठे मोठाले खड्डे पडले आहेत. परळीला ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ महादेवाच्या दर्शनासाठी दर सोमवारी परभणी जिल्ह्यातून या रस्त्याने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे.

दत्तवाडी नैकोटवाडी या ठिकाणी दररोज तसेच दर गुरुवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक भक्तजन मुक्तेश्वर नारायण दत्तानंद संस्थान,दत्तवाडी नैकोटवाडी या परिसरात दर्शनासाठी येतात. गुरुवारी तर या परिसराला यात्रेचे स्वरूप असते. 

परळी वैजनाथ ते खडका रोडा मार्गे असलेले रस्ता 'थर्मल रोड' म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत खिळखिळा झाला आहे. या रस्त्याने परळी ते खडका,परळी ते नैकोटा या व इतर एसटी महामंडळाच्या बसेस देखील चालतात. या रस्त्याचा परळी ते लोणी हा 15 किलोमीटर पर्यंत भाग परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यात येतो तर लोणी ते खडका 10 किलोमीटरचा भाग हा पाथरी मतदारसंघात सोनपेठ तालुक्यात परभणी जिल्ह्यात येतो.

परळी ते खडका या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. बीड व परभणी जिल्ह्याच्या सीमेवर (बॉण्ड्रीवर) असलेला हा महत्वपूर्ण रस्ता सध्या प्रचंड खराब झाला असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 हा रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय झाल्याने परळी व परभणी जिल्ह्यातून या भागातील गर्भवती महिला, वयोवृद्ध व्यक्ती व आजारी व्यक्तींना दवाखान्यात लवकर जाण्यासाठी हा अत्यंत धोकादायक रस्ता बनला आहे.तरी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....