वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण

इमेज
  परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           येथील  बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.           परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घड...

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी  

सत्य,न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचे प्राण -डॉ माधव रोडे  परळी प्रतिनिधी...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.माधव रोडे यांनी सत्य न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचे प्राण आहेत हे सांगून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील एक थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि शिक्षणक्रांतीचे जनक होते. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, जातिभेद निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला  त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली हे सांगून कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’  असे रोखठोकपणे असे विचार यास प्रसंगी व्यक्त केले. 

     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर असलेल्या दिसून येतात. स्त्रियांना जर शिक्षण मिळाले नसते तर त्यांची परिस्थिती विदारक बनली असती. फुले दाम्पत्यांना या कार्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते,तरी देखील त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले व ते पूर्णत्वाकडे नेले. आजच्या काळात महिलांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व विचाराचे अनुकरण करावे असा संदेश याप्रसंगी दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप गायकवाड तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही बी गायकवाड यांनी मांडली या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड, प्रा डी के आंधळे, प्राध्यापक हरीश मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....