इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...

भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

परळीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व आशा भोसले 

ज्येष्ठ साहित्यिक मधु जामकर यांनी जागवल्या आशा भोसलेच्या आठवणी

परळी वैजनाथ- प्रतिनिधी...

परळीत आयोजित केलेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण सूर सम्राज्ञी आशा भोसले यांची संगीत रजनी ठरले होते.आशाताईंचा स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा बाणा या संमेलनातही उपस्थितांना पाहता आला.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १९९८ साली म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.या संमेलनातील विविध परिसंवाद, चर्चासत्रे, काव्य संमेलने, या सर्व कार्यक्रमांमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम हा सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे सादरीकरण आकर्षण ठरले. 

या संमेलनाची संकल्पना "साहित्य-सूर" अशी असल्याचे आशाताईंसमोर मांडल्यानंतर तेव्हा त्यांनी परळीस येण्यास तत्काळ होकार दिला आणि त्यांचा सांगीतिक कार्यक्रम न भूतो.असा ठरल्याच्या आठवणी या संमेलनाचे कार्यवाहपद भूषवलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांनी आशाताईंच्या निधनानंतर जागवल्या.

मराठी विषयाचे प्राध्यापक राहिलेले मधु जामकर यांनी सांगितले की, १९९८ साली परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील भव्य प्रांगणात मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष विनोदी साहित्याचे प्रख्यात लेखक प्रा. द. मा. मिरासदार होते. उदघाटक उर्दू साहित्यिक अली सरदार जाफरी होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. तर समारोपाच्या मुख्य पाहुण्या होत्या बंगाली साहित्यातील प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी होत्या. अशा अत्यंत दिग्गज सारस्वतांच्या मांदियाळीने हे संमेलन साहित्य प्रेमींचे आकर्षण ठरले होते. 

यातील पहिल्या दिवसाच्या कवी कक्षाच्या संमेलनाचे अध्यक्षपद कविवर्य प्रा. वसंत बापट यांनी भूषविले होते. तर कविता सादर करणाऱ्यांमध्ये नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, शंकर वैद्य, नीरजा, फ. मु. शिंदे, इंद्रजित भालेराव, नारायण कुळकर्णी, महेश केळुसकर, नीलिमा गुंडी आदी दिग्गज कवींनी सादरीकरण केले होते. 

समारोप २६ एप्रिल १९९८ रोजी झाला. या दिवशी रात्री आशा भोसले यांचा "नक्षत्रांचे देणे" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे आशाताईंशी संपर्क करता आला आणि त्यांनी मोठ्या आनंदाने परळीच्या संमेलनाला येण्याचे मान्य केले. वैयक्तिक आपला त्यांच्याशी पंधरा मिनिटे संवाद झाला. त्यात साहित्य हा विषयही होता. आपल्या एकूणच साहित्यासह इतरही साहित्याबाबतची माहिती त्यांनी आपल्याकडून अत्यंत आस्थापूर्वक ऐकली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....