नुकसान भरपाईची मागणी ...

इमेज
  महावितरणचा हलगर्जीपणा भोवला; र्लोंबणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श; चालता ट्रक पेटला ; पशुखाद्य जळून खाक परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा:- तालुक्यातील सेलू येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबणाऱ्या  विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, पशुपालक शेतकरी विलास राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.            मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास राठोड हे आपल्या ट्रकमधून जनावरांसाठी कडबा घेऊन जात होते. सेलू परिसरातून जात असताना रस्त्यावरील महावितरणच्या विद्युत तारा खाली लोमकळत होत्या. या तारांचा स्पर्श ट्रकला झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या परळी परिसरात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उष्णतेमुळे ही आग वेगाने पसरली. सेलू येथील युवक नेते  बाळू फड प्रसंगावधान राखून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला.औष्णिक क...

Motivational story......जिद्दीने मिळवले यश

घरची हलाखीची परिस्थिती, पितृछत्र हरपले तरी जिद्दीने मिळवले यश; दर्शन निले पालघर पोलीस दलात दाखल 

घाटनांदूर | प्रतिनिधी :

जीवनात कितीही संकटं आली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यावर मात करता येते, याचं उदाहरण घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील चि. दर्शन शंकर निले याने दाखवून दिलं आहे. वडिलांचं अकाली निधन, घरची हलाखीची परिस्थिती आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या अशा अडचणींमध्येही त्याने पालघर पोलीस भरतीत १३२ गुण मिळवत यश मिळवलं आहे.

दर्शनचे वडील स्व. शंकर निले हे कपड्याचे छोटे व्यापारी व आईचा शिवणकाम चा व्यवसाय होता. कै.शंकर आप्पा नीले यांच्या व्यवसायावरच कुटुंब चालत होतं. मात्र, त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठं संकट आलं. 

आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, घराचा आधारच हरपला. अशा परिस्थितीत अनेकजण खचून जातात, पण दर्शनने धीर सोडला नाही. वडिलांचं “मुलगा पोलीस व्हावा” हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला आणि त्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत राहिला.

पोलीस भरतीची तयारी करताना त्याने स्वतःला शिस्त लावली. पहाटे उठून धावणे, मैदानी सराव, शारीरिक चाचण्यांची तयारी आणि त्यानंतर अभ्यास असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. कोणत्याही मोठ्या कोचिंगशिवाय त्याने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. साध्या परिस्थितीत राहूनही त्याने आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि प्रयत्न सुरू ठेवले.

नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत दर्शनने ओबीसी प्रवर्गातून १३२ गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. धावणे, शारीरिक चाचण्या आणि लेखी परीक्षेत त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याची पालघर पोलीस दलात निवड झाली. त्याच्या मेहनतीचं हे फळ असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

दर्शनच्या यशामुळे निले कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. वडिलांच्या निधनानंतर आई आणि मावशीने दिलेलं पाठबळ, कुटुंबीयांचं सहकार्य आणि स्वतःची जिद्द यामुळे तो इथपर्यंत पोहोचला. त्याच्या यशामुळे घाटनांदूर गावात आनंदाचं वातावरण आहे. गावकऱ्यांकडून त्याचं अभिनंदन होत असून अनेकांनी त्याचा सत्कारही केला आहे.

दर्शनचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिस्थिती कठीण होती, पण वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आईच्या पाठबळामुळे आणि मेहनतीमुळे हे शक्य झालं. जिद्द ठेवली तर यश नक्की मिळतं,” असं दर्शन शंकर निले याने सांगितलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....